साश्रु नयनाने पिंपरी नेहरू नगर स्मशान भुमीत लक्ष्मण संभाजी कदम उर्फ एल.एस.कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ,श्रद्धांजली वाहुन शोकाकुल चाहत्यांनी अखेरचा निरोप घेतला. रविवारी दि.११संप्टेबर रोजी सकाळी ११ वा . सुखवानी चेंबर निवासस्थानी पुण्यानुमोदन श्रद्धांजली,आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम .

पिंपरी

          सेवा भावी संयमी कोण्याच्याही अडचणी सोडविण्यासाठी धावून जाणारे लक्ष्मण संभाजी कदम तथा एल.एस.कदम यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्प आजाराने काल दि.६सप्टेबंर रोजी दुपारी दोन च्या दरम्यान दुखःध निधन झाले. त्यांच्या मागे दोन विवाहित चिरंजीव एक विवाहीत कन्या नातवंडे असा परिवार आहे.

दि.६ संप्टेबरला दुपारी एल.एस.कदम यांची दुखःध निधनाची वार्ता कळताच पिंपरी मासुळकर काॅलनी ,मोरवाडी व देहूरोड परिसरात शोकाकुल वातावरण पसरले. देहूरोड जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचे दूरध्वनी एल.एस.कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली ने भरून गेले. ह्युमन राइट्स जस्टीस असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष ईम्तियाज शेख, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे, मानव अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी, मावळ तालुका अध्यक्ष रज्जाक शेख, जनसंपर्क प्रमुख प्रशांत जोगदंड, सचिव दीपक मधुरकर, धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के.एच.सुर्यवंशी,प्रवक्ते प्रकाश कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी, मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण संगठन या संघटनेचे राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख प्रभाकर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष दीपक चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर सचिव विजय पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. शोकाकुल वातावरणात एल.एस.कदम यांचे निवासस्थान पिंपरी सुखवानी गृह संकुलातुन

दि .७ संप्टेबरला सकाळी ११ च्या दरम्यान मासुळकर काॅलनी सिद्धार्थ संघाच्या वतीने वंदना होऊन अंत्ययात्रा नेहरू नगर स्मशान भुमीत गेले . या तेथे एल.एस.कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या या वेळी प्रसंगाची जाणीव ठेवून सिद्धार्थ संघाचे प्रमुख व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस चे नेते नरेंद्र बनसोडे यांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्ययात्रा व अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचे शालेय संवगडी सहभागी होते.उपस्थितांनी दोन मीनट मौन राहुन श्रद्धांजली वाहिली.

 

   रविवारी ११ संप्टेबरला सकाळी ११ वा. त्यांच्या निवासस्थानी पिंपरी सुखवानी गृह संकुलात पुण्यानुमोदन दिन श्रद्धांजली, आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे जाहीर करण्यात आले.

YOUR REACTION?

Facebook Conversations