पालिकेने थेट कारवाईचे आदेश, २५९१ अधिकृत होर्डिंग तर अनाधिकृत ८० होर्डिंग.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. :- सोमवारी (दि.13) मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या होर्डिंगमुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिक या होर्डिंगखाली दाबली गेली होती. अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पुणे महापालिका आता जाग आली आहे पुणे मध्ये यापुर्वी होर्डिंग कोसळून मृत्यू मुखी पडले होते त्यानंतर परत देहूरोड येथे मुकाई चौक किवळे येथे पाच ते सहा लोक दगावले होते, आता पुणे शहरात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने   १५६४ अनधिकृत होर्डिंगसवर कारवाई केली आहे.

पुणे शहरात असलेल्या सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरात एकूण  २५०० होर्डिंग्स आहेत. या सगळ्या होर्डिंग्सची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जर अनधिकृत असेल तर त्याचा परवाना रद्द करुन कारवाई केली जाणार आहे. जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत. त्यावर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

शहरामध्ये अडीच हजार होर्डिंग्सला परवानगी आहे. मात्र तेवढेच होर्डिंग अनधिकृत आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.२५९८  अधिकृत होर्डिंग्स आहेत. शहरात फक्त ८० अनधिकृत होर्डिंग्स आहेत. यात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्स हडपसरमध्ये आहेत. २३०० होर्डिंग्सचे ऑडिट झाले आहे. त्यातील आतापर्यंत एकूण १५६४ अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे पालिकेने कारवाई केली आहे. येत्या काळात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यात अनेकदा होर्डिंग्स पडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर पालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कारवाई थंड झाली. मात्र, मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेला परत जाग आली आहे. त्यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations