प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती महिला पुरुष तर किती लोकांनी केले मतदान एकुण मतदान किती जाणुन घ्या.

मावळ दि. :- महिनाभरापासून राजकारणाचे रणधुमाळी शांत झाले आहे उभे राहिलेले उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत बंद झाले आहे कोण उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता सर्वाना आहे तर ४ जुन रोजी कोणा कोणाचे नशीब उघडणार आहे पाहाणे ही महत्त्वाचे असेल. दिनांक १३ मे २०२४ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने मंगळवारी जाहीर केली आहे. त्यानुसार मावळ मतदारसंघात एकूण ५४.८६ टक्के मतदान झाले.

मागीलवेळी ६० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी ५ टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. उरणमध्ये सर्वाधिक तर पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

या मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापैकी १४ लाख १८ हजार ४३९ जणांनी मतदान केले. त्यामध्ये ७ लाख ७७ हजार ७४२पुरुष तर ६ लाख ४० हजार ६५१ महिला आणि इतर ४६ जणांनी मतदान केले आहे.पनवेलमध्ये  ५०.०५टक्के मतदान

पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ९१ हजार ३९८ मतदार होते. त्यापैकी २ लाख ९५ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी  ५०.०५टक्के आहे.

कर्जतमध्ये ६१.४० टक्के मतदानकर्जत विधानसभा मतदारसंघात ३ लाख ९ हजार २०८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ८९ हजार ८५३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.६१.४० टक्के मतदान झाले.

उरणमध्ये सर्वाधिक ६७.०७ टक्के मतदान

उरण विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १९ हजार ३१८ मतदार आहेत.  त्यापैकी २ लाख १४ हजार १६९ जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६७.०७ टक्के इतकी आहे.

मावळमध्ये ५५.४२ टक्के मतदान

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ७३ हजार ४०८ मतदार आहेत. त्यापैकी  २ लाख ६ हजार ९४९ जणांनी मतदान केले. याची टक्केवारी ५५.२० टक्के आहे.

चिंचवडमध्ये ५५.२० टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख १८ हजार २४५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख २२ हजार ७०० जणांनी मतदान केले. याची टक्केवारी ५५.२० टक्के आहे.

पिंपरीत ५०.५५ टक्के मतदान

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ७३ हजार ४४८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७९५ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. याची टक्केवारी ५०.५५℅  आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations