जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचा उपक्रम

 देहूरोड पुणे दि.१४ एप्रिल

देहूरोड ः प्रती वर्षा प्रमाणे देहूरोड विश्र्व सुर्य डाॅ.बाबा साहेब ‌आंबेडकर रूग्णालयातील विश्र्व सुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास १३ एप्रिल रात्री १२ वा.विश्र्व सुर्य बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून सर्वात प्रथम अभिवादन करण्यात आले.                    विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महा मानवाची पुतळा स्थापना नंतर विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १३ एप्रिलच्या मध्य रात्री म्हणजे १४ एप्रिल घ्या प्रारंभास बरोबर १२ वा.जन्म झाले. तेऔचित्य साधुन जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी  पुढाकार घेऊन विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादनाने जयंती उस्तवास प्रारंभ करण्याचे उपक्रम सुरू केला.    पुढे या उपक्रमाला मामुर्डी,शितळानगर,गांधी नगर,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर  या भागातील तसेच धम्म नेते के.एच.सुर्यंवंशी आॅर्डन्स् फॅक्टरी पंचशील मंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांनी ही पंचशील मंडळाचे भिम सैनिक,भिम सैनिका फॅक्टरी वसाहतीतून प्रज्वलित मेणबत्ती घेऊन विश्र्व सूर्यास अभिवादन करण्यास प्रारंभ केला.असे प्रत्येक विभागातुन  १३ एप्रिलच्या मध्यरात्री प्रत्येक भिम सैनिक,भिम सैनिका,प्रज्वलित मेणबत्ती  घेऊन उपक्रमात सहभागी होण्यास सूरू केल्याने उपक्रमाची भव्यता वाढली. विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादना नंतर ऐतिहासिक बुद्ध विहारात तथागत भ.बुद्ध मूर्तीला वंदन,बाबांच्या अस्थिस्तुपास अभिवादन, विहारात बुद्ध वंदना,प्रवचन   होऊ लागले.या उपक्रमात गांधीनगर विशाल मित्र मंडळ,गांधीनगर पाण्याच्या टाकी जवळील युवक मंडळ  ढोली बाजा च्या निनादात  वाजत गाजत सहभाग घेऊ लागले.गेल्या वर्षा पासुन कोरोना महामारी मुळे या उपक्रमास अवकळा आली. अंत्यंत मर्यादीत स्वरुपात अभिवादन कार्यक्रम झाला. पण या वर्षी तर जमाव बंदी आदेशा मुळे  देहूरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील,व देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांचे हस्ते अभिवादन कार्यक्रम रहित केला.चार व्यक्तीच्या वर न जमण्याचे आदेशाचे पालन करुन उपक्रमात खंड पडू नये म्हणून जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी फक्त चि.निखील यांना बरोबर घेऊन १३ एप्रिल घ्या मध्यरात्री बरोबर १२वा.विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विश्र्व सुर्यास  विश्र्व सुर्य बहु उद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations