पुन्हा सतत वीज खंडीत झाल्यास कार्यालयाला टाळा ठोको व रस्ता रोको अंदोलन करण्याचा शिष्ट मंडळाने दिला इशारा.

तीन महिनेचे अवधी द्या, वीज पुरवठा सुरळीत होईल:- सह अभियंता मनोज पुरोहित यांचे आश्वासन.

वृत्त जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे.

देहूरोड दि. ६ :- देहूरोड मध्ये मागील सहा महिने पासुन सतत वीज खंडीत वारंवार होत असल्याने रावेत वीज वितरण कार्यालयातील वीज वितरण अधिकारी कर्मचाऱ्यां विरुद्ध देहूरोडकर जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. संपूर्ण देहूरोडकर या बाबत नाराजगी व्यक्त करत आहेत व अनेक लोक तक्रारी देऊन देखील वीज पुरवठा नियमित होत नाही या बाबत अनेक सामाजिक संघटनेचे लोकांनी लेखी तक्रार वीज मंडळाच्या अधिकार्यांना दिले तरी देखील वारंवार वीजेचा लपंडाव सुरुच आहे. वीज कार्यालयात फोन केले तरी फोन उचलत नाही व उडवा उडवीचे उतर दिले जाते किंवा फोन चे रिसीव्हर खाली ठेवून फोन नाॅट रिचेब्ल दाखवते अनेक वेळा वीज वितरण चे कर्मचारी देखील फोन उचलत नाही व फोन लागले तर चार पाच तासानी येतात एखाद्यादे ने फोन केला तर वीज बील भरल्य का? तुमचा ग्राहक क्रमांक ध्या असे उलटे विचारले जाते दोन दोन दिवस वीज गायब असते त्यामुळे चाकरमान पासुन ते गृहिणी, शाळा काॅलेज व आयटी क्षेत्रात कामगारांना याचा फटका बसत आहे कंपनी ने वर्क फ्राॅम होम काम चालू ठेवले आहे वीज पुरवठा नियमित नसल्याने अनेकांना काम घालवण्याची वेळ या कामगारांनवर आले आहे याला जबाबदार कोण असे प्रश्न देहूरोडकरांना पडला आहे. 

या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका पक्ष संघटक हिरामण साळुंखे यांनी रावेत येथील वीज वितरण कार्यालयात दोन वेळा लेखी तक्रार दिली तेव्हा वीज वितरण अधिकारी यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल म्हणून आश्वासन दिले पण परिस्थिती जैसे थे तरी ही वीज पुरवठा रोजच खंडीत होत असल्याने परत आपले कार्यकर्ता सहीत भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले कि रोज सकाळी पाच सहा वाजता वीज जाते व सायंकाळी सहा नंतर वीज गायब होऊन रात्री दहा अकरा वाजता वीज येते जर हे वीज पुरवठा सुरळीत झाले नाही तर शिष्टमंडळ सह घेराव घालण्यात येईल असा इशारा पक्ष संघटक हिरामण साळुंखे यांनी दिली होती तरी पण वीजेचा लपंडाव काय बंद होईनासे झाले शेवटी आज दि ५ रोजी पक्ष संघटक हिरामण साळुंखे यांनी राष्ट्रवादी कामगार सेलचे दिपक चौगुले, देहूरोड शहर युवक अध्यक्ष अशिष बंसल, सरचिटणीस दिनेश बालघरे, उपाध्यक्ष मावळ तालुका बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष प्रकाश चंदनशिवे प्रवक्ते धनश्री दिंडे आणि ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर व जिला महासचिव चंद्रशेखर पात्रे या शिष्टमंडळासहीत आज वीज वितरण कार्यालयात अधिकारी मनोज पुरोहित या अधिकारीला घेराव घातला व दिलेल्या अश्वासनाचे उत्तर मागीतले प्रश्नाचे उत्तर मागितल्याने अधिकारी व कर्मचारी गोंधळात पडले पक्ष संघटक हिरामण साळुंखे यांनी अधिकारीला चांगलेच धारेवर धरले जर आपणास वीज पुरवठा सुरळीत करता येत नसेल तर तसे आम्हाला लेखी लिहुन द्यावे असे अट घातले. तर महिला प्रवक्ते धनश्री दिंडे यांनी ही गृहीला वीजेमुळे किती त्रास सहन करावा लागत आहे माहीत आहे का ? रोज सकाळी सकाळी वीज गेल्याने सकाळी जेवणाचा डब्यापासुन ते पाणी भरण्या पर्यंत त्रास सहन करावा लागतो, वीज नसल्याने इमारती मध्ये पाणीपुरवठा होत नाही व पाणी पिण्यासाठी आटापिटा करावा लागतो. युवक अध्यक्ष अशिष बंसल यांनी ही आम्ही देहूरोड बाजारपेठेत व्यवसाय करतो वीज नसल्याने आमच्या व्यवसाय करणारे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागतो आम्ही हे सहन करणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे पदाधिकारी कार्यकर्ता गप्प बसणार नाही जर वीज परत परत गेले तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा आंदोलन करु असा इशारा दिला. 

या वेळी कामगार सेल अध्यक्ष दिपक चौगुले यांनी ही अधिकारीला चांगलेच झापले कधी ही फोन केले तर नीट उतर मिळत नाही वीज पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक लोकांना हे त्रास सहन करावा लागत आहे असे आम्ही चालु देणार नाही आम्ही योग्य ते कार्यवाहीची मागणी करणार असे सांगितले. या वेळी दिनेश बालघरे यांनी ही वीज संदर्भात आम्ही तुम्हाला भेटुन पत्र व्यवहार करून देखील समाधानकारक काम होत नाही हे त्यामुळे वीज वितरणचा भोंगळ कारभार आम्ही उघडे करू असा इशारा दिला ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी ही वीजपुरवठा बाबत नाराजगी व्यक्त करून अधिकारीला विचारले कि का वीज वारंवार जाते त्यामुळे अनेक शिक्षण घेणारे शाळेय विध्यार्थी, कामगार वर्गाला फारच त्रास सहन करावा लागत आहे जर वीज पुरवठा सुरळीत झाले नाही तर ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशन संघटनेच्या वतीने योग्य ते कारवाई ची मागणी करणार असल्याचे तनवीर मुजावर यांनी सुनावली, 

 बाळासाहेब जाधव यांनी अनेक ठिकाणी वीज वाहीने हे जुने झाले आहे त्यात जास्त वीज पुरवठा होत असल्याने वीज वाहीनी तुटून पडतात दहा वेळा त्याला ठिगाळ पीळा मारून तिच वीज वाहीनी वापरले जाते पण वीज प्रवाह दाबाने वाढलेतर ते परत तुटून जाते हे नित्याचे झाले आहे तर तेथे नवीन वीज वाहीनी टाकावे असे सांगितले. 

ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशन चे सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी ही अधिकारीला चांगलेच धारेवर धरले श्रीकृष्ण नगर वसाहत येथील तर दर तासांनी वीज खंडीत होत आहे तेथील विधुतरोहणी कमी क्षमतेचे आहे तेथून अनेक ठिकाणी वीज पुरवठा होतो त्यामुळे बसविलेले विद्युतरोही हे बदलून मोठी विद्युतरोही बसवण्यात यावा अशी मागणी केली व वीज वितरण कर्मचारी वारंवार फोन केले तर फोन वर आलेल्या व्यक्तीचे नंबर डायव्हर्ड करण्यात येते आणि फोन केले कि वीज बील भरले आहे का? तुमचे वीज क्रमांक पाठवा असे प्रतिप्रश्न करतात व उदंड बोलतात तुमचे कर्मचारी मध्ये वीज ग्रहकांशी बोलण्याची पद्धत नाही सर्व कर्मचारी बदमाश गीरी करतात असे सुनावले. 

हे सर्व ऐकुन घेतल्यावर सहाय्यक अभियंता अधिकारी मनोज पुरोहित यांनी आपले मत मांडले व सांगितले कि मला येथे येऊन आताशी वर्षभर होत आहे वीज वितरण कार्यालयात कर्मचारी कमतरता, त्यात देहूरोड चे वीज पुरवठा हे बिजलीनगर येथुन होत आहे त्यात सहा टप्प्यात वीज वाहीनी गेले आहेत वीज जर गेली तर हे सहा टप्पे आम्हाला चेक करावा लागतो एक एक करत सुरळीत करावा लागतो त्यात देहूरोड हे वीज वितरण कार्यालयाचा शेवटचा टप्पा आहे म्हणून वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो तर ही देहूरोड च्या अनेक ठिकाणी वीज वाहीनी बदलून नीट करण्यात आले आहे मला तीन महिने ची अवधी ध्या सगळे प्रश्न सोडवतो आता वीज वितरण कार्याल्याला दोन एकर जागा रावेत येथे उपलब्ध होत आहे आणि सबस्टेशन होणार आहे ते सबस्टेशन झाले कि सर्व ठिकाण चे विद्युत पुरवठा सुरळीत होईल या साठी आणखी कालावधी लागेल असे सांगितले त्यावर पक्ष संघटक हिरामण साळुंखे यांनी म्हटले जर हे झाले नाही तर वीज असेच खंडीत होत राहणार का ? तुमचे काय अडचणी आहे ते तुम्ही बघा तात्पुरता का होईना वीज सुरळीत पाहीजे जर तुम्हाला काही साहित्य किंवा इतर सामग्री लागत असेल तर ते आम्हाला सांगा ते आम्ही आमदार खासदार कडुन मदत करु पण सध्या जे वीज खंडीत होत आहे ते नीट करा जर वीज परत परत खंडीत झाले तर आम्ही वीज कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करून रस्ता रोखो करणार असा ही इशारा पक्ष संघटक हिरामण साळुंखे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, युवक अध्यक्ष अशिष बंसल, दिनेश बालघरे व महासचिव चंद्रशेखर पात्रे यांनी दिला.


•••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations