उद्या सायंकाळी आठ वाजता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार लाॅकडाऊन ची घोषणा

देहूरोड पुणे

मंत्रिमंडळ बैठकीत कडक लाॅकडाऊन लावण्याची मागणी  करण्यात आली,राज्यातील सर्व मंत्री मंडळाशी आज चर्चा ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राज्यात कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही,असा आग्रह माननीय मुख्यमंत्र्यांना प्रत्येक मंत्र्यांनी केला राज्यात वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव, रुग्ण कमी होत नाही तोपर्यंत कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे,उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री लाॅकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर करणार आहेत,संपूर्ण राज्यात उद्या आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांचा कडक लाॅक डाऊन लावण्यात यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, दहावी व बारावी परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी मंत्रिमंडळात आपले मत मांडले असता त्यावर सर्व मंत्र्यांनी विचार करून सात राज्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली,

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाठ आल्यामुळे देशात हाहाकार झालेला आहे,याचे पडसाद सर्वत्र बघायला मिळत आहेत,महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ,या आजारावर मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आज महाराष्ट्र राज्य सरकार घेत असलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला,आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, सध्याचे वातावरण परीक्षेस अनुकूल नाही म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations