महाशिवरात्र यात्रे निमित्त चार ते पाच लाख शिवभक्तांनी दोन वर्षा नंतर मुक्त पणे घोरवडेश्वर लेणीतील शिवशंभू पिंडी चे दर्शन घेतले.

देहूरोड दि.1मार्च

         कोरोना महामारीच्या प्रार्दुभावामुळे गेली दोन वर्ष महाशिवरात्री दिनी हवेली,मावळ पंचक्रोशीतील शिव भक्तांना उंच माथ्यावरील घोरवडेश्वर लेणीतील शिव शंभु पिंडीचे दर्शन लाभले नाही. आणि शासनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे महाशिवरात्री यात्रा ही भरली नाही. यंदा शिव शंभुच्या दर्शनासाठी गेले दोन वर्षे आसुसलेल्या शिव भक्तांनी मुक्त पणे हर हर महादेव ,शिव शंभो चा नामघोष गर्जना करीत उंच घोरवडेश्वर डोंगर चढून माथ्यावरील घोरवडेश्वर लेणीतील शिव शंभू पिंडी चे मुक्त पुणे दर्शन घेतले.व मुक्तपणे घोरवडेश्वर डोंगर पायथ्याशी हर्षो उल्हासात महाशिवरात्र यात्रेचा आनंद लुटला. महाशिवरात्री निमित्त पहाटे पासुन ते रात्री उशिरापर्यंत लेणी माथ्यावर महिला, पुरुष शिव भक्तांची दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती. नेहमी शुकशुकाट असलेला घोरवडेश्वर डोंगर परिसर आणि मुंबई पुणे महामार्ग लाखो शिव भक्तांनी फुलून गेला होता. महाशिवरात्री निमित्त पहाटे मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे हस्ते शिव शंभु पिंडी अभिषेक महापुजा,आरती संपन्न झाली.या वेळी ह.भ.प.मुकुंद नाना राऊत,तुषार दत्तात्रय तरस यांच्या सह देवस्थान चे विश्वस्त मंडळ उपस्थित होते. महाशिवरात्री निमित्त लेणीत पहाटे पासुन रात्रीं उशीरा पर्यंत भजनी मंडळांचा भक्तिमय भजनांचा कार्यक्रम झाला. महाशिवरात्री निमित्त गेला सप्ताह भर चालेल्या हरिनाम सप्ताहाचे उद्या लेणीत काल्याचे किर्तनाने व अन्न प्रसादाचा भंडारा होऊन महाशिवरात्री भक्तीमय सोहळ्याची समाप्ती होईल. देहूरोड पोलिस व तळेगाव दाभाडे पोलिसांनी महाशिवरात्री यात्रेचे उत्तम नियोजन केले होते. व चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच देहूरोड तळेगाव वहातुक विभागाचे वहातुक पोलिसांनी सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत चोख वहातुक नियंत्रण केले. देहूरोड शिव शंकर मंदिरात महाशिवरात्री निमित्त महिला पुरुष शिव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्री निमित्त महिला, पुरूष भजनी मंडळांचा भक्ती मय भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला.                         

अशोक कांबळे वृत्त संपादक

YOUR REACTION?

Facebook Conversations