कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन.करुन देहूरोड मध्ये तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी

देहूरोड पुणे दि.३१           

देहूरोड शहरात सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रीत शासनाचे नियम पालन करून शिव जयंती साजरी केली. शिवस्मारकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दत्ता मामा तरस यांचे चिरंजीव तुषार तरस यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यांनी प्रारंभी शिवस्मारकात श्री गणेश व. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे भा.ज.पा. माजी देहूरोड शहराध्यक्ष अॅड.कैलाश पानसरे यांच्या हस्ते पुजन झाले. ऐतिहासिक सुभाष चंद्र बोस चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पूजन व पुतळ्यास पुप्षमाला अर्पण शिवसेना मावळ समन्वयक रमेश जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ सेवा भावी नेते रेणू रेड्डी यांच्या हस्ते झाले. सुभाषचंद्र बोस चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी देहूरोड शहराध्यक्ष मिक्की कोचर व शिवसेना देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वर संयोजन केलेल्या छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते इंद्रपालसिंग रत्तू व रिपब्लिकन पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी भाजपा चे जेष्ठ तुकाराम जाधव, शिवसेना सल्लागार देवा कांबळे,विलास हिनकुले, शिवसेना देहूरोड,उप शहर प्रमुख संदीप बालघरे, शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत सप्पागुरू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनजंय मोरे, गणेश कोळी, शिवाजी दाभोळे,महेश केदारी,आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे

YOUR REACTION?

Facebook Conversations