नागरिकांच्या तक्रारी आल्याने देहूरोड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख यांनी घेतली दखल.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. ११ :- देहूरोड शहर वार्ड क्रमांक चार व बाजार पेठ दुध केंद्रा जवळ पिण्याच्या पाणी मध्ये आळ्या आढळून आल्याने नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावरण झाले व एकच खळबळ उडाली आळ्या सापडल्याने चर्चेला उधाण आले पिण्याच्या पाणी मध्ये आळ्या सापडल्याने तेथील रहिवासीयांने त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख यांना संपर्क करून लोकांनी कळविले. ही बातमी कळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख हे स्वतः या गाभिर्याची दखल घेत पाणीपुरवठा मध्ये आळ्या सापडल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालिन अधिक्षक राजन सावंत याचाशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधुन पाण्या मध्ये आळ्या सापडल्याचे सांगितले तसेच आताच कोरोनाच्या महामारीतुन लोकांची थोडीफार सुटका झाली आहे परत आळ्या सापडल्याने नवीन आजाराला समोर जावे लागले असे त्यांनी अधिक्षक राजन सावंत यांना सांगितले. ही बाब लक्षात घेत क्षणाचाही विलंब न करता तत्काळ राजन सावंत यांनी दखल घेतली व पाणी पुरवठा वितरण विभागाचे अभियांत्रिकी टोनी यांना या बाबतची माहिती दिली अभियांत्रिकी टोनी यांनी लगेच कर्मचार्यांना पाठवुन पाण्या मध्ये आळया येत असल्याचे सांगितले कर्मचारी यांनी शिवाजी नगर येथे पाईपलाईन ची तपासणी केली बरेच शोधाशोध केले पण नक्की कोठे पाणी गळती झाले आहे ते कळाले नाही. या बाबत द जस्ट आज वृत्त वाहीनी चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांनी अधिक्षक राजन सांवत यांच्याशी संपर्क साधले असता कर्मचारी यांना नक्की गळती अजून सापडलेले नाही जो पर्यंत गळती सापडत नाही तो पर्यंत नागरिकांनी पाणी भरताना काळजीपूर्वक पाणी भरावे व पाणी गाळुन प्यावे असे सुचना दिले आहेत व उद्या या बाबत नक्की शहनिशा करून पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा शुद्ध करून दिले जाईल असे द जस्ट आज वृत्त वाहीनीला माहिती देताना दिली. या बाबत नागरिकांनी ही संतोष व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख यांचे ही नागरिकांनी आभार मानले.

 वृत्त संपादक अशोक कांबळे. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 🗣📲📞 9767508972/7219500492

YOUR REACTION?

Facebook Conversations