पेपर फुटीचे सत्र थांबेना, कुठल्या केंद्रावर झाले, कशी झाली चौकशी सुरू, लातुर मध्ये एमबीबीएस चे ही पेपर फुटी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

अहमदनगर दि. १४:- अहमदनगरच्या श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास आधीच पेपर फुटला होता. एवढंच नाहीतर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर म्हणजेच, व्हॉट्सअॅपवर आल्या होत्या. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुंबईत बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचं समोर आलं होतं. त्यापाठोपाठच आता श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटला आहे. बारावी बोर्ड परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबायचं नावच घेत नाही आहे. श्रीगोंद्यातील या पेपरफुटीबाबत गट शिक्षण विभागानं मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाचा पेपर होता. मात्र, त्यापूर्वीच सुमारे पावणे दहाच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका नेमकी कुठून फुटली याबाबत माहिती नाही. शिक्षण विभागाचे अधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले असून नेमका हा प्रकार कोणत्या केंद्रावर झाला आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 लातूरमध्ये एमबीबीएसचा पेपर फुटला

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटला असल्याचे समोर आले. हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली. 

वृत्त संपादक अशोक कांबळे

 बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞 9767508972/7219500492

YOUR REACTION?

Facebook Conversations