चाहात्यांना अश्रु अनावर,परिवारासह अनेक दिग्गज उपस्थित.

पुणे दि. १५:- एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजविणारे मराठी चित्रपटातील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी आज अनंतात विलीन झाले यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युत दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी,मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच तळेगाव येथील राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.साधारणपणे तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.त्या घटनेची माहिती रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर याला मिळताच तो  मुंबईहून तळेगाव दाभाडेला आला.तर या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला.

त्यानंतर सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविंद्र महाजनी यांच्या जाण्याने अनेक चाहते दुखी झाले तर काहीना अश्रू अनावर झाले रविंद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते होते त्यांना लोक मराठीतील विनोद खन्ना असे ही म्हणत होते ७० च्या दशकात त्यांनी खुप नाव कमवून आघाडीवर होते १९६९ साली त्यांनी महानायक अमिताभ बच्चन च्या सात हिंदुस्तानी या चित्रपटात पदार्पण केले त्यानंतर व्ही शांताराम दिग्दर्शित झुंज या १९७५ साली मराठी चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी सर्वश्रेष्ठ भुमिका असलेले चित्रपट लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. 

आज पुण्यात त्यांचा अंतिम संसकारच्या वेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयांसह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी  उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations