आज छाननी तर लढतीचे चित्र सोमवारी समोर येणार. कोण आहे हे तीन उमेदवार जाणून घ्या.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 मावळ दि. :- मावळ लोकसभेसाठी ३८ उमेदवार पैकी ५० अर्ज दाखल झाले आहेत 

मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झालेले ३८ व्यक्तींनी केलेल्या अर्जांपैकी ३ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. यामुळे मावळ मध्ये मतदारसंघात पुढे काय घडणार यांची उत्सुकता वाढली आहे कागपत्रांची पूर्तता न करणे तसेच, वेळेत डिपॉझिट न भरणे या कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी हा निर्णय दिला आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात  दाखल झालेले ३८ व्यक्तींनी केलेल्या अर्जांपैकी ३ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. कागपत्रांची पूर्तता न करणे तसेच, वेळेत डिपॉझिट न भरणे या कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी हा निर्णय दिला आहे.मावळ मतदार संघ अंतर्गत गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८ व्यक्तींनी ५० अर्ज दाखल केलेले होते. शुक्रवारी सकाळीच सुरू झालेल्या छाननी मध्ये यापैकी तीन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद ठरवण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळवले देखील होते. मात्र त्यांनी वेळेत ते दाखल न केल्याने हे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

कोण आहेत तीन उमेदवार

संजय वाघेरे (अपक्ष), राजेंद्र छाजछिडक आणि विजय ठाकूर अशी त्या तिघांची नावे आहेत. यापैकी वाघेरे यांनी वेळेत मतदार यादीची साक्षातिक प्रत दाखल केली नाही केले तर, छाजछिडक यांनी प्रतिज्ञा पत्र जोडले नव्हते. तर, ठाकूर यांनी अनामत रक्कम न भरल्याने हे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations