भारतात पोर्न फिल्मवर बंदी असताना देखील पोर्न फिल्मचे शुटींग, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

लोणावळा दि. ३० :- पुणे म्हटले कि शिक्षणाचे माहेरघर पण या शिक्षणाचे माहेरघरी काय चालले आहे शरमेने मान खाली घालण्याची घटना घडली आहे पोर्न फिल्म बनविणे पोर्न फिल्म प्रसारित करणेवर बंदी असताना देखील लोणावळ्यात एका व्हीला मध्ये पोर्न फिल्म चे चित्रिकरण सुरू होत याबाबत ची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीसांना माहीती पडताच पोलीसांनी छापा टाकून ५ महिला सह १८ लोकांना ताब्यात घेतले यामुळे लोणावळ्यात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लोणावळ्यात आर्णव व्हीला पाटण गाव येथे भाड्याने घेऊन त्याठिकाणी चक्क ‘पॉर्न फिल्म’ करण्याचे कारनामे सुरू करण्यात आले होते. याबाबतचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला. परराज्यातील तरुणी आणि तरुण असे १५ जणांचे टोळके या पॉर्न फिल्म तयार करीत असल्याचे समोर आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

  याप्रकरणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे त्यानुसार  विष्णू मुन्नासाहब साओ (वय-३० , रा.१६ परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-३५ , रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय २३ , रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय ३८ , रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय २१ , रा. लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-२९ , रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय २६ , रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय २९ , रा. काशीबाई चाळकांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१ , रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय ३२ , रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय २८ , रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८ , रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१ , रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय २० , रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२ , रा. मळवली, ता. मावळ), आकेष गौतम शिंदे (वय ३२ , रा. मळवली, ता. मावळ) व सनी विलास शेंडगे (वय ३५ , रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. 

या सर्वान वरती भादवि कलम २९२,२९३,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कायदे कलम ६७ ६७ (अ)  स्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३,४,६ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्लील डिजीटल कंटेट पुरविणाऱ्या तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही गॅंग पॉर्न फिल्म तयार करीत होती. विविध राज्यांमधील तरुण आणि तरुणी याठिकाणी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी लोणावळा येथील या व्हीलावर छापा टाकला. तेव्हा पॉर्न व्हिडिओचे शुटींग सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चित्रीकरण झालेले सर्व फुटेज ताब्यात घेतले आहे. यासोबतच कॅमेरे आणि अन्य साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

भारतात पॉर्न व्हिडिओ अगर पॉर्न फिल्म तयार करण्यास बंदी आहे.तसेच पोर्न फिल्म बघण्यासाठी ही बंदी आहे याविषयी गुन्हे दाखल करून खटला चालविण्याचे प्रवाधान कायद्यात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पाच तरुणींचा समावेश असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

YOUR REACTION?

Facebook Conversations