सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुुरकर यांचा आगळा वेगळा उपक्रम

देहूरोड दि.२६मे

वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून साथरोग वाढीस कारणीभूत ठरणे तसेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करत रस्त्यावर फटाके फोडून मोठा केक कापून अनेक जण वाढदिवस साजरा करतात, परंतु दिपक मधुरकर यांनी तसे न करता २३ मे रोजी वाढदिवस होता, आणि तो वाढदिवस मधुरकर यांनी अन्नदान करुन आगळावेगळा वाढदिवस साजरा केला,वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुरकर यांनी वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी न देता गोर गरीब निराधार अनाथ लोकांसाठी १०० हून अधिक जेवणाची पाकिटे बनवून अन्नदान केले, दिपक मधुुरकर यांच्या बरोबर प्रशांत जोगदंड, सिध्दार्थ कांबळे, राजकुमार यादव, रमेश चलवादी, यांनी ही अन्नदान करताना यावेळी मदत केली, वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे आहे असा विचार साधारणपणे करण्यात येतो,  अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो.सगळे करतात म्हणून आपणही चुकीच्या गोष्टी करणे योग्य नाही, म्हणून मी व माझा मित्र परिवार असे सामाजिक कार्य करुन वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे, असे  दिपक मधुरकर यांनी जस्ट आज ला माहिती दिली,

YOUR REACTION?

Facebook Conversations