ईडीच्या कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

नागपूर: दि. ५ :- आधीच ईडीच्या कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नवाब मलिक यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी समीर वानखेडे यांचे बंधू संजय वानखेडे यांची याचिका रद्दबातल करण्यास नकार दिला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय अनुसूचित जातीचे नाहीत तर ते मुस्लिम आहेत असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. मलिकांचे ते वक्तव्य आमच्या कुटुंबाचे अवमान करणारे असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संजय वानखेडे यांनी वाशिम पोलिसांकडे केली होती.मात्र, वाशिम पोलिसांनी त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्यामुळे संजय वानखेडे यांनी वाशिमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. वाशिमच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने संजय वानखेडे यांच्या याचिकेवर नवाब मलिक यांना नोटीस बजावली होती. वाशिमचे न्यायालयाच्या नोटिसीला नवाब मलिक यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.

 वृत्त संपादक अशोक कांबळे 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 📞9767508972/7219500492

YOUR REACTION?

Facebook Conversations