जगातील क्रिकेट ईतिहासात शेन वॉर्न हे महान फिरकी गोलंदाज होते शेन वॉर्न च्या जाण्याने अनेक चाहात्यांना मोठा धक्का

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 नवी दिल्ली, ४ :- क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक व दुखद वृत्त समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, महान फिरकी गोलंदाज दिग्गज शेन वॉर्न यांचं वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे.ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानलं जातं. १९९२ मध्ये ते पहिली टेस्ट मॅच खेळले होते आणि श्रीलंकाचे मुरलीधरननंतर १००० आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेऊन दुसरे बॉलर ठरले होते. असे उत्कृष्ट महान फिरकी गोलंदाज यांच्या दुखद निधनाने संपूर्ण जगा मध्ये त्यांचा जाण्याणे दुख व्यक्त केले जात आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations