कडक निर्बंध लावा.
लाॅकडाऊन नका लावू .

देहूरोड पुणे दि:३०

 शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावावे, परंतु लाॅकडाऊन लावू नये, कोरोना संसर्ग रोखणे हे शासनाची,प्रशासनाची,जबाबदारी आहे तशीच नागरिकांची मोठी जबाबदारी आहे.यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे,असे आवाहन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा सचिव अरुण जगताप यांनी केले.

शासनाने लोकांना जगवायचे आहे की मारायचे आहे 

कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे , आज निगेटिव्ह आलेला व्यक्ती उद्या पाॅझिटिव येऊ शकतो ,मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? डब्लू एच ओ ने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. आणि कोरोना या रोगा बद्दल कोणी अनभिज्ञ असेल असं वाटत नाही.त्यामुळं प्रत्येकाला जगायचंय की मरायचय हे त्याच्यावर सोडून द्यावं. प्रत्येकाला आता चांगलं माहिती झालय की कोरोना कशानं होतोय.त्यामुळं प्रत्येकाला जिवाची काळजी असतेच पण,कोणा तरी एकासाठी सर्वांना वेठीस धरणं योग्य नाही.

 लाँकडाऊन करायचयच तर सर्वांच्या जगण्याची सोय अगोदर सोय करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. जे चार दोन टक्के लोकं लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत, हे सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे ? त्यांना काम नको म्हणून तर ते लॉकडाऊन ची मागणी करतात. त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा. आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय. हे पुन्हा लक्षात घ्या देश हा घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी ,श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो.

   वर्षभर कोरोनाने मारले आता तुम्ही लॉकडाऊन करून जनतेला उपाशी नका मारु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे कोणी उपाशी मरणार नाही जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा.काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो,तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील.नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील,पण लॉक डाऊन मुळीच नको प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल ,त्याला कोरोना अगोदर उपसमारीने मारू नका.

     आजही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत, विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार,असाच लॉकडाऊन राहिला तर लोकं उपसमारीमुळे आत्महत्या करतील. मा.मुखमंत्री साहेब आपण राज्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करा. व योग्य निर्णय घ्यावा.

YOUR REACTION?

Facebook Conversations