भा.ज.पा. चा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर निवडणुकीत विजयाची मोठी मुसंडी मारल्याने देहूरोड शहर भा. ज.पा. च्या वतीने लाडू पेढे वाटुन भव्य मिरवणुकीने विजयोत्सव साजरा.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. १० :- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, या चार राज्यात निवडणुकीत भा.ज.पा. पक्षाने विजया ची मोठी मुसंडी मारल्याने देहूरोड शहर भा.ज.प.च्या कार्यकर्त्यांनी देहू रोड ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करत,देहूरोडकरांना लाडू पेढे वाटत देहूरोड शहरातुन भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. प्रारंभी देहूरोड शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कँन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॶॅड. कैलाश पानसरे भाजपाचे नेते गुरमीत सिंग रत्तु तर ऐतिहासिक स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास भाजप देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार ,रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. ढोल-ताशाच्या निनादात ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकातून विजयोत्सव च्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. "भाजप पक्षाचा विजय असो" " देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो" अशा घोषणा देत देहूरोडकरांना पेढे ,लाडु वाटप करीत मिरवणुक बाजार पेठेतून स्वामी विवेकानंद चौक, मुंबई पुणे महानगर मार्गाने वरुन अबुशेठ मार्ग वृंदावन चौक,छत्रपती शिवाजी महाराज मार्गा वरुन म. फुले मंड ई वरुन, सराफ बाजार, वाल्मिकी ॠषी महाराज मंदिर मार्गा वरुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून स्वामी विवेकानंद चौक, मुंबई पुणे महामार्गाने पुन्हा वाजत गाजत ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीत ॶॅड. कैलास पानसरे, भा.ज.प.शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, पक्ष नेते महावीर बरलोटा, मदन सोनिगरा, विशाल खंडेलवाल, विलास शिंदे, सूर्यकांत सूर्वे, संजय पिंजण, उमेश जैन, धीरज नायडू, हनीफ शेख, अनिल खंडेलवाल, अनिल शेलार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड पक्षनेते इन्‍द्रपाल सिंह रत्तु, अशोक चव्हाण, भा.ज.प.देहूरोड शहर महिला शहराध्यक्षा सारिका मुथ्था, ज्येष्ठ नेत्या सुशीला नरवाल, सुनीता शिंदे आदि सहभागी होत्या. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे.

 बातमी व जाहीराती साठी संपर्क. 📞9767508972/7219500492.

YOUR REACTION?

Facebook Conversations