मंगळवारी निर्णय बैठक.

देहूरोड दि. :- भारतीय संविधान सन्मान समिती रॅलीच्या वतीने देहूरोड कँन्टोन्मेंट मतदार यादीतील नावे वगळल्या प्रकरणी देहूरोड मध्ये प्रथम बैठक संपन्न या बैठकीत समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे, कोषाध्यक्ष के. एच .सूर्यवंशी, कार्यकारी समन्वयक रामदास ताटे, कार्यकारी समन्वयक चंद्रशेखर पात्रे, कार्यकारी समन्वयक प्रकाश कांबळे, कार्यकारी समन्वयक परशुराम दोडमणी, कार्यकारी समन्वयक रजाक शेख,कार्यकारी समन्वयक बाबू हिरमेटकर, कार्यकारी विजय पवार, आणि धर्मपाल कांबळे उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित समन्वयकात बांधक समन्वयकांची चर्चा झाली. यावेळी मुख्य समन्वयक अशोक कांबळे यांनी आपले मत मांडताना आपले मतदार यादीतील नावे वगळले त्या बद्दल कोणात्याही पक्ष नेत्यांना जाणीव नाही व देणे घेणे नाही.आपला हक्का साठी आपल्याला कृतीशील संघर्ष करावा लागणार आहे.   सर्व सामान्यांचा ज्वलंत समस्या पुर्ती न करता.उलट पुन्हा उमेदवारी  लढवण्याची गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.सध्या  लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी चाललेली आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुकीची  घोषणा होऊन आचार संहिता लागु होण्याची शक्यता आहे तेंव्हा वेळ न घालविता  केंद्रीय मानव हक्क आयोग न्यायालयात याचिका दाखल होऊन केंद्र सरकार व केंद्र निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगांना सूचना पत्र जाणे महत्त्वाचे आहे. असे महत्वपूर्ण मत मांडले यावेळी कार्यकारी समन्वयक चंद्रशेखर पात्रे यांनी आपण कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत राहातो आणी देहूरोड हे हवेली मतदारसंघात येते आणी आपले सर्व काही हवेली मतदारसंघातून काम होत असते आपले राशन कार्ड, डोमोसियल, जन्म मृत्यू नोंद, घराचे लोन, खरीदी विक्री,मुलांचे शैक्षणिक कर्ज घर कर्ज हे सगळे महत्त्वाचे काम हवेली मधुन होते, आम्ही स्थानिक जागेवर राहुन आपल्याला कॅन्टोन्मेंट बोर्डात मतदानाचा अधिकार नाही मग आपण विधानसभा   लोक सभासाठी का? मतदान करावे असे महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. या वेळी परशुराम दोडमणी यांनी मागील वेळी या बाबत अनेक नेत्यांनी याबाबत प्रयत्न केले. अनेक वेळा कॅन्टोन्मेंट बोर्डा समोर आंदोलन उपोषण केले .पण सगळे व्यर्थ गेले स्थानिक पातळीवर आम्हाला मतदान करण्याचा हक्क नाही. मग विधानसभा, लोकसभा साठी आपण का? मतदान करायचे असे दोडमणी यांनी सवाल केला. तर विजय पवार यांनी गेल्या वेळेस राज्यकीय पुढारीनी अनेक प्रयत्न केले न्यायालयात याचिका देखील दाखल केले पण काही कारणास्तव हे प्रश्न प्रलंबित च राहीले आहे. परत एक ही नेत्याने पुढाकार घेतला नाही या मुळे स्थानिक पातळीवर आपले मतदान हिरावून घेतले आहे. म्हणून आता संविधानाच्या सन्मानासाठी वगळलेली नावे पुन्हा सामाविष्ट करणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी मांडले.मुख्य समन्वयक अशोक कांबळे म्हणाले  हे महत्त्वाचे कार्य आपल्या समितीचे ज्येष्ठ समन्वयक एम डी चौधरी, डॉ शालक अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे  बैठक अगोदर झाले आहे ही समस्या संपूर्ण ६२ कॅन्टोन्मेंटची असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष सुनील म्हस्के सर यांचेही मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे यासाठी वेळ न घालविता प्रत्येक कृती होणे गरजेचे आहे. असे त्यांनी म्हत्वाचे मत मांडले  या साठी पुढची बैठक येत्या मंगळवारी २७ फेब्रुवारी ला घेण्याची सर्व मतानी ठरले. शेवटी चंद्रशेखर पात्रे यांनी उपस्थित समन्वयकांचे आभार मानले.

YOUR REACTION?

Facebook Conversations