आर्थिक दुर्बलांना अन्न धान्याचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या उपक्रमांतर्गत निगडी अन्नधान्य परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांचे आवाहन .
व्यापक प्रतिसादासाठी आणखी आठवडाभर मुदत वाढवावी ह्युमन राइट्स जस्टीस असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांची मागणी.

निगड़ी

                             ज्यांचे उत्पन्न ५९ हजारावर आहे. त्यांनी  आपला अन्नधान्य   वरचा हक्क सोडावा  असे  अवाहन  निगडी अन्नधान्य  परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे  यांनी ५९ हजारावर  उत्पन्नावरील  रेशनिंग  चा लाभ घेणार्‍या  रेशनिंग  धारकांना  केले  आहे.                निगडी  परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे  यांनी उच्च  उत्पन्न  असलेल्या  रेशनिंग धारकांना अवाहन  करताना म्हणाले ज्यांच्या  घरात चारचाकी वाहन आहे. घरात वातानुकूलित यंत्रणा  आहे. घर किंवा  शेती आहे. घरातील  कोणी शासकीय पेन्शन  घेत असेल  कोणी  परदेश  वारी केले  असेल अशांनी आपला रेशनिंग वरचा हक्क सोडावा  असे अवाहन  करून खोटी माहिती  देऊन  जर अन्नधान्य  घेतल्यास गहू  २४ रूपये  किलो  तांदुळ ३४ रूपये  किलोने वसूल  करून त्यांच्या  विरूद्ध  शासनाची फसवणूक  केल्याचा गुन्हा दाखल करून  कारवाई केली जाईल. असा ईशारा   निगडी  परिमंडल अधिकारी दिनेश तावरे  यांनी  दिला आहे.       

                               ज्यांचे उत्पन्न ५९ हजारावर आहे. अशा शिधापत्रिका धारक कुटुंब  प्रमुखांनी आपल्या रास्त धान्य  वाटप दुकानातुन  किंवा  निगडी  परिमंडल कार्यालयातून अर्ज आणावे. त्या  अर्जात  कुटुंब प्रमुख यांनी               अन्नधान्यासाठी सवलतीची अवश्यकता नसल्याने मी माझ्या शिधा पत्रिकेवरील राष्ट्रीय अन्नधान्य  सुरक्षा  अधिनियम २०१३ अंतर्गत माझ्या कुटुंबीयां करीता देय  असलेल्या  सवलतीच्या दराने अन्नधान्य  मिळविण्याचा हक्क स्व ईच्छेने  सोडू ईच्छीतो परिणामी अन्य गरजू  जनतेला  अन्नधान्याचा  लाभ  मिळू शकेल.  असा  छापील  अर्ज  भरून  त्या  अर्जाच्या  सत्य  प्रतीची  छायाकिंत  प्रत, शिधा  पत्रिकेचे  छायाकिंत  प्रत आपल्या रास्त धान्य वाटप दुकानात  अगर निगडी  परिमंडल कार्यालयात दाखल  करावे. असे अवाहन निगडी अन्नधान्य  परिमंडल अधिकारी  दिनेश तावरे यांनी केले आहे.  

                                        दरम्यान  शासनाची  गोर  गरिबांसाठी  स्तुत्य  उपक्रम  आहे. याची  अर्ज दाखल  करावयाची मुदत ३१ऑगष्ट  आहे. म्हणावे  तसे  जनजागृती  झाली  नाही. बहुसंख्येने  प्रतिसाद  मिळविण्यासाठी  अर्ज दाखल  करण्याची मुदत  आणखी आठवडा वाढविण्याची  आवश्यकताआहे. जेणे करुन  सिधा वाटप दुकानदार ज्यांचे उत्पन्न  ५९ हजारावर आहे  अशा   शिधा पत्रिका धारकांना कळवु  शकतील तसेच ३१ऑगष्ट  शे वटची तारीख होती त्या दिवशी  सुट्टी  होती तरी निगडी  परिमंडल अधिकारी  दिनेश तावरे  साहेबांनी  आणखी  आठवडाभर  मुदत वाढवावी अशी मागणी  राष्ट्रीय  ह्यूमन राइट्स जस्टीस असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी  द जस्ट आज वृत्त वाहिनी कडे मांडली

YOUR REACTION?

Facebook Conversations