रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी आदेश लागू

देहूरोड पुणे दि.२८

देहूरोड : राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भावा मुळे राज्य शासनाने काही नवीन सुचना जारी केल्या आहेत, सुचनेचे पालन सर्वांनी करावे,पालन न केल्यास आपणास दंड आकारण्यात येणार आहे, रविवारी रात्री ८ वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे,ती मोडल्यास १००० दंड आकारला जाईल. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० दंड आकारला जाईल. विना मास्क (मुखपट्टी)फिरल्यावर ५०० रुपये दंड पडेल, 

रात्री ८ पासून सकाळी ७ पर्यंत जमावबंदी लागू असलेल्या वेळेत सर्व सिनेमागृहे,

रेस्टॉरंट,माॅल्स,उद्याने, बंद राहणार आहेत.

कोरोना संकट संपेपर्यंत लग्न कार्यात फक्त ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीं ची मर्यादा देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी लावण्यात आली आहे,

धार्मिक स्थळांवर जागेची उपलब्धता लक्षात घेऊन ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित करावे, आँनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी,कोरोना नियमांचे पालन केले आहे किंवा नाही ते पाहूनच मंदिरात व मस्जिद मध्ये प्रवेश द्यावा.असे आदेश शासनाने दिले आहेत,

YOUR REACTION?

Facebook Conversations