सर्व अन्न व्यवसायिक छोटे-मोठे खाद्य व्यापारी यांना अन्न व औषध प्रशासनाची सूचना.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे पुणे

 पुणे दि. २३ :- अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिनांक ५/८/२०११ पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा मुख्य उद्देश जनतेचा सुरक्षित सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे आहे. अनेकदा लोकांन मार्फत बाहेरून खाण्यासाठी खाद्य पदार्थ, नाश्ता मागविला जातो त्या वेळी विक्री करणारा व्यवसायक वडापाव, पोहे, भजी,भेळ, भेळपुरी या सारखे अन्य पदार्थ वर्तमान पत्रा मधून बांधून देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो, तसेच छपाई केलेले वृत्तपत्राची शाई हे केमिकल पासून बनवलेले असल्याने (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकल्स चा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केली जाते. ते माणसाच्या आरोग्यास धोकादायक असल्याने अशा वर्तमान पत्रा मध्ये गरम पदार्थाचे पॅकिंग करणे व ते ग्राहकांना देणे ग्राहकांच्या हितासाठी धोकादायक ठरत आहे. 

त्या मुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण एफ एस एस ए आय ( FSSAI ) भारत सरकार यांनी दिनांक ६/ १२/ २०१६ चे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तरी सर्व अन्य व्यवसायिक छोटे-मोठे हॉटेल्स, बेकरी, व्यवसायिक, स्नॅक सेंटर, स्वीट मार्ट, वडापाव, विक्रेते यांना सुचित करण्यात आले आहे की, आता वर्तमान पत्रा मध्ये कोणते ही खाण्याचे अन्न पदार्थांचे पॅकिंग देणे त्वरित बंद करावे व असे आढळून आले किंवा निदर्शनास आले तर अन्न औषध प्रशासन विभागाच्या मार्फत अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६च्या नियम व नियमन २०११च्या अंतर्गत योग्य ती कठोर करण्यात येईल असा ईशारा अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

वृत्त संपादक अशोक कांबळे.

 बातमी व जाहीराती साठी संपर्क. 9767508972/7219500492

More Details Less Details

उत्कृष्ट रेडिमेड दालन.

उत्कृष्ट रेडिमेड दालन.

YOUR REACTION?

Facebook Conversations