मावळ तालुक्यातील तरूणांचे हक्काचा रोजगार हिरावून, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, प्रकल्प गुजरातला नेले, मुख्यमंत्री बेरोजगांर तरूणांचे माफी मागतील का? :- आमदार सुनिल शेळके.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

मावळ दि. १४ :- मावळ तालुका व महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेऊन महाराष्ट्रातील बेरोजगांराचे तोंडाला पान पुसल्यामुळे मावळ तालुक्यात होत असलेल्या वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपन्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन गेले. गुजरात मधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्र सरकार गुजरातचे हित जपत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने तैवान येथील फाॅक्सकाॅन व वेदांता कंपनीचा सेमीकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प मावळ तालुक्यात आणला होता. आता हे प्रकल्प गुजरातला गेले असल्याचा निषेधार्थ

या बाबत मावळचे आमदार सुनील शेळके, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी निषेध मोर्चासाठी आवाहन केले आहे. गुरुवारी दि. १५/९/२०२२ रोजी दुपारी १:०० वाजता श्री पोटोबा महाराज मंदिर येथून हा निषेध मोर्चा निघणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक देखील होणार आहे. अशी माहिती आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी दिली.

मावळ तालुक्यातील होत असलेल्या वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेला आहे, या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगांराचे रोजगार गेले व महाराष्ट्राला पिछाडीवर आण्याचा काम या सरकारने केले आहे व गुजरातची निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्र गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. मावळ तालुक्यातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का ? असा आमचा प्रश्न आहे.या निर्णयाच्या विरोधात सरकारचा धिक्कार करीत निघणा-या या निषेध मोर्चात आपण सहभागी व्हावे असा आवाहन करण्यात आले आहे. व गुरूवार दि. १५/९/२०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगण, वडगाव मावळ पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.मोर्चा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक विश्रामगृह वडगाव मावळ येथे होणार आहे. तरी सर्व पदाधिका-यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, युवक अध्यक्ष किशोर सातकर आदींनी केले आहे.


•••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞. 


{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations