ऋषीकेश वाघेरे यांची मतदाराशी होम टू होम गाठीभेटी, युवा वर्ग ऋषीकेश वाघेरे यांच्या पाठीशी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

चिंचवड दि. २९ :- जसे जसे निवडणकीचे दिवस जवळ येत आहेत तसे तसे प्रचाराला व गाठीभेटीला वेग येत आहे प्रत्येक पक्षाचे घरचे सदस्य देखील प्रचारात उतरून काम करीत आहेत महाविकास आघाडीचे   (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे देखील कंबर कसली आहे. ते मॉर्निंग वॉक दरम्यान युवकांशी संवाद साधत वडिलांचा प्रचार करत आहेत. मशाल चिन्ह पोहोचविण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे.विशाल नगर येथील महापालिकेचे ज्ञानज्योती सावित्री फुले उद्यान आणि वाकड येथील तानाजीभाऊ कलाटे उद्यान या ठिकाणी युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मयूर जाधव, सुनील कस्पटे, इंजि. देवेंद्र तायडे, सागर वाघेरे, निलेश नाणेकर, शुभम चव्हाण, शरद वाघेरे, योगीत काटे, सुरज पोळ, अनिकेत नाणेकर, शितल मल्हाडे यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवार संजोग वाघेरे यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे हे मतदार संघात “घर टू घर” गाठीभेटी घेत आहेत. मॉर्निग वॉकमधून आलेले मतदारांपर्यंत संवाद साधून त्यांना आवाहन करीत आहेत. प्रचारात शिवसेना ठाकरे “पक्षाचे मशाल” हे चिन्ह मतदारांपर्यंत आणि “घर टु घर” पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. ऋषिकेश हे युवा सहका-यांना सोबत घेऊन पिंपरी, चिंचवड सह मावळ मतदार संघातील विविध भागात मशाल चिन्ह पोहचवत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारात त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations