पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख आदेश पत्रका द्वारे आदेश जारी,आदेश भंग केल्यास सक्त कठोर कारवाई.

जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे सह प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 पुणे :- : श्री गणेश स्थापना ३१ ऑगस्ट विसर्जनाच्या दिवशी ९ व १० सप्टेंबरला पुणे जिल्ह्यात दारू दुकाने सक्त बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी आदेश पत्रका द्वारे दिले आहेत. या आदेशा मुळे दिनांक ३१ ऑगस्ट आणि ९ सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस पुर्ण पणे जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. दि. ९ व १० सप्टेंबरला 

 विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्या भागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत श्री गणेश स्थापना व श्री गणेश विसर्जन दिनी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे. या साठी दारू विक्री दुकानांवर तीक्ष्ण नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे भंग झाल्यास सक्त कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंद चा कालावधी आणि बंद चे क्षेत्र या बाबत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी आदेश पत्रक प्रसिद्ध केले आहे. या आदेशाचे पत्रका नुसार, ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान च्या काळात श्री गणेशोत्सव साजरा होत आहे. 

 या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने दारू विक्री करणारी दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित व्हावे. असे आदेश संबधित अधिकारी यांना दिले आहेत. उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळे नंतर मुजोर दारू विक्रते दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात. अशा बेकायदेशीर कृत्यास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष (स्पेशल साॅक्ड ) पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकां मार्फत दारू दुकांनाचीअचानक तपासणी केली जाणार आहे. दारू विक्री बंद चे आदेश क्षेत्र असे 

३१ ऑगस्ट – पूर्ण पुणे जिल्हा

९ सप्टेंबर – पूर्ण पुणे जिल्हा

१० सप्टेंबर – पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व विक्री अनुज्ञती, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंतच्या कालावधीकरिताप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार मद्य निषेध अधिनियम १९४९ मधील नियम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर नुसार पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी आदेश पत्रका द्वारे आदेशजारी केले आहेत .

 या आदेशान्वये  ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणच्या मार्गावरील सर्व भागातील दारू विक्री विसर्जनाच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे भंग करणाऱ्यां दारू विक्रेत्या विरुद्ध महाराष्ट्र  मद्य निषेध अधिनियम १९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे याआदेश पत्रकात म्हटले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations