सतत गुंगारा देत फिरत होता अखेर संगमनेर येथून ओला-उबेर गाडी मधुन पसार होत होता पाठलाग करून घेतल ताब्यात.

 

पुणे दि.०१:- गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी  मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला  होता. यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरले होते.     

 पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारणेला हा सतत पोलीसांना गुंगारा देत फिरत होता पुणे पोलीसांनी  संगमनेर परिसरातून ओला-उबेर गाडीतून जात असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेश मारणेचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत फिरत होता. त्याच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलिस होते. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा नाशिक येथून पाठलाग सुरू केला. एकुण ३ पथके त्याचा पाठलाग करीत होती. अखेर त्याला संगमनेर परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारांना देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations