दोन दिवसा नंतर आणखी कडक निर्बंध लावण्यात येतील-राजेश टोपे

देहूरोड पुणेे दि १९ किराणा सामान खरेदी च्या नावावर रिकामे फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी किराणा दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे,राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहे, नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही, राज्यात लागू केले नियम असताना देखील कोरोना रुग्णाची संख्या काही कमी होताना दिसत नाही, त्यामुळे किराणा दुकानाची वेळ सकाळी ७ ते अकरा ११ करण्याचा निर्णय घेण्यात आला, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, राजेश टोपे यांनी सांगितलं निर्बंध अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना देखील दिले आहेत, कोरोना रुग्णात वाढ होत असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी केल्या जातील असे त्यांनी यावेळी म्हटलं एक दोन दिवसा मध्ये आणखी कडकडीत बंद केले पाहिजे,अनेक लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर दिसत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी किराणा दुकाने सात ते अकरा च्या दरम्यान सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे जिल्हा स्तरावर याबाबत निर्णय घेण्यात आले आहे, त्यामुळे आता किराणा दुकान सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुली राहणार आहेत,

YOUR REACTION?

Facebook Conversations