आता पुणे पोलीस काय कारवाई करतात या कडे सर्वाचे लक्ष.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. ६ :- एम पी डी ए कायद्याअंतर्गत पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे यांची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे ला एक वर्ष स्थानबद्ध केले होते ही एक वर्षाची मुदत संपल्यानंतर नागपूर कारागृहातुन रविवारी दुपारी दोन वाजता गजानन मारणे यांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती ॶॅड विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. 


यामुळे तब्बल आठ वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगातून बाहेर असणार आहे कुख्यात गुंड गजानन मारणे ची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने त्याची 16 फेब्रुवारी 2019 रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती कारागृहातून बाहेर येतात गुंड गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमून फटाके वाजवले तसेच आरडाओरडा करून दहशत निर्माण केली हा प्रकार मुंबई पुणे दुर्गति मार्गावर उर्से टोल नाका येथे घडला याप्रकरणी मारणे सहज त्यांच्या साथीदारांवर पुणे पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले न्यायालयाने जामीन मंजूर करताच तो न्यायालयाच्या आवारातून पसार झाला होता 


 पुणे पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलिस त्याचा शोध घेत होते ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीए कायद्याखाली प्रस्ताव तयार करून जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पाठवला होता त्यांनी तो मंजूर केला मात्र तेव्हा गजानन मारणे फरार होता ग्रामीण पोलिसांनी त्याला जावळी तालुक्यातील मेंढा येथे 7 मार्च 2019 रोजी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती पुण्यातून त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले होते त्याची मुदत संपल्याने त्याची आज दुपारी दोन वाजता नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे गजानन मारणे यांच्या काढलेला रॅलीमध्ये बहुतांश गुंडावर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामुळे आता पुढे पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 वृत्त संपादक अशोक कांबळे. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 📞9767508972/7219500492.

YOUR REACTION?

Facebook Conversations