कोरोना महामारी मुळे न्याय हि रखडले.

 पुणे  आकुर्डी दि.२३         

आकुर्डी ःमानवी आयोगात दाखल तीन निष्पांचा बळी घेतलेल्या भोसरी जनीत्र स्फोट प्रकरणा ची सुनावणी १२ एप्रिलला होती. वाढत्या कोरोना महामारी मुळे मानवी हक्क आयोगाचे न्यायाधीश एम.ए.सय्यद यांनी सुनावणी रद्द केली. पुढील सुनावणी चे तारीख कळविण्यात येणार असल्याचे तक्रार दार  व मानवी अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  एम.डी.चौधरी यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाच्या न्यायालयात त्याच १२ एप्रिलला सांगली कोल्हापूर महापुर शेतकरी नुकसान दाखल प्रकरणाची सुनावणी न्यायाधिश एम.ए.सय्यद यांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे  झाली.या  शेतकय्रांना न्याय मिळवून देणारे तक्रारदार व मानवी अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांच्या सह विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय जलसिंचन, कोल्हापूर, सांगली जल सिंचन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी हजर होते. पण त्यांनी त्यांचे म्हणणे आयोगाच्या न्यायालयात सविस्तर मांडण्या साठी   वेळ मागीतली  न्यायाधिश एम.ए.सय्यद यांनी त्यांची विनंती मान्य केली. न्यायाधीश एम.ए.सय्यद यांनी तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्रालय जनसंपदा व पुणे विभागीय आयुक्त यांना दिला, पुढील तारिख लवकर च जाहीर होईल,

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी १६ एप्रिल ला होती, कवठेमहांकाळ येथील श्रीकांत माळी हत्या प्रकरणाची सुनावणी १९ एप्रिल ला होती, तसेच सांगली जिल्ह्यातील कुरुळुप येथील अनाथ आश्रमातील ८ मुलींचे लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी वाढत्या कोरोना महामारी मुळे पुढे ढकलण्यात आली, असेही एम.डी.चौधरी यांनी सांगितले,                     

  वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations