पाच जणांचा बळी घेणाऱ्या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी इतर संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.

 देहूरोड दि. १८ :- अवकाळी पाऊस त्यात सुसाटवाऱ्या मुळे बेंगलोर-मुंबई महामार्गालगत किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जण जागीच ठार झाले होते तर, तिघेजण गंभीर जखमी झाले होते ही घटना सोमवारी दिनांक १७ सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता सेंन्टोसा हाॅटेल मुंबई पुणे बंगलोर हायवे लगत घडली होती या दुर्दैवी घटने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

"सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल" 

होर्डिंग दुर्घटना प्रकरणात जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२), ३४ नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"या घटनेत पाच जण ठार"

शोभा विजय टाक (वय ५०, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. "जख्मी झालेले व्यक्ती" विशाल शिवशंकर यादव (वय २०, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय २१, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.

या घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्ती आणि जखमी जवळच असलेल्या एका बांधकाम साइटवर काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना लवकर सोडण्यात आले होते. घरी जात असताना अचानक सोसायट्याचा वारा आल्याने हे कामगार एका गाडी पंक्चरच्या दुकाना मध्ये आडोशाला थांबले. त्याचवेळी सुसाटवाऱ्यामुळे मोठा होर्डिंग कोसळून ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र दुख प्रकट होत आहे तर काही मृतकांचे आज अंतिम संस्कार देखील करण्यात आले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations