आता शिव भोजन थाळी चा गोरगरीब जनतेला शासनाचा आधार

निगडी दि.२२  राज्य शासनाने कोरोना विषाणुची साखळी तोडण्या साठी ब्रेक द चैन या मोहिम सुरु करून कडक टाळेबंदी राज्यात सुरु केली आहे. ब्रेक द चैन या मोहिमे अंतर्गत पिंपरी चिंचवड परिसरातील ११ मोफत शिव भोजन केंद्रात मंगळवार दि.२२ एप्रिल पासुन मोफत शिव भोजन केंद्रात पुर्वीचा वेळ बदलून सकाळी ७ ते ११ या वेळेत मोफत शिव भोजन थाळी वाटप सुरू केले आहे. लाभार्थ्यांनी या वेळेतच मोफत शिव भोजन थाळीचा लाभ घ्यावा,असे आवाहन पिंपरी चिंचवड अन्नधान्य वितरण विभागाचे परीमंडळअधिकारी दिनेश तावरे यांनी केले आहे. कोरोना ब्रेक द चैन या मोहिमे अंतर्गत मंजूर ठिकाण च्या मोफत शिव भोजन केंद्रा च्या परिसरातील श्रमिक बांधकाम मजूर ,पर राज्यातील कामगार शालेय विद्यार्थी, गरजु यांना जेवणा अभावी हाल होऊ नये या साठी नियमित प्रतिदिन मंजूर मोफत शिव भोजन थाळी पेक्षा दीड पट वाढ केली आहे.पुढील एक महिना लाभार्थ्यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच आपल्या मोफत शीव भोजन केंद्रावर‌ शीव भोजन थाळी मिळणार आहे. गोर गरीब,गरजुंनी शासनाने दिलेल्या वेळेतच लाभ घ्यावा असे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी पुनश्च आवाहन केले. संबंधित शिव भोजन केंद्र चालकाने लाभार्थींना मुख पट्टी घालण्यास सांगावे.सामाजिक अंतर राखुन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मोफत शिव भोजन थाळी चे वाटप करावे,व कोरोना प्रार्दुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करावा अश्या सुचनाही परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी शिव भोजन केंद्र चालकांना केली आहे. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पुणे

YOUR REACTION?

Facebook Conversations