भक्तीमय वातावरणात २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंत वार्षिक गुरूमत संगम भक्ती मय धार्मिक कार्यक्रम संपन्न.

देहूरोड दि. :- देहूरोड गुरुसिंग सभा गुरुद्वारात सालाबाद प्रमाणे २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंत वार्षिक गुरुमत समागम २०२४ वार्षिक दिवाण विविध  भक्तीमय धार्मिक विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. 

गुरुद्वारात  शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता गुरु ग्रंथ साहेब ग्रंथाचे अखंड पाठचे कार्यक्रमाने कार्यक्रमाचे शुभारंभ झाला.  दलजीतकोर जोगा सिंह  परिवार यांनी अखंड पाठास प्रारंभ केले. २१ फेब्रुवारीला दलजीत कोर जोगा सिंग परिवार यांच्या वतीने निशान साहेबांचे कार्यक्रम झाला. शनिवार २४ फेब्रुवारी संध्याकाळी ६:४५ ते ७:१५  या वेळेत सोडर रेहरास साहेब यांच्या दिवाण साहेब यांच्या धार्मिक कार्यक्रम झाला. सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत आरती कीर्तनकार भाई सोहन सिंग जी यांचे कीर्तन झाले. रात्री कीर्तनकार भाईसाहेब इंद्रजीत सिंग खालसा यांचे कीर्तन झाले. 

रविवार दिनांक २५ फेब्रुवारीला सकाळच्या कार्यक्रमात २३ फेब्रुवारी पासून  दलजीत कौर जोगासिंग परिवार च्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी पासून चाललेल्या अखंड पाठाचे सांगता झाली. सुप्रसिद्ध गुरुवाणी कीर्तनकार यांनी  कीर्तनकार भाई सोहन सिंग यांचे कीर्तन झाले. 

दुपारच्या कार्यक्रमात भाई लखविंदर सिंग यांची कथा झाली. सुप्रसिद्ध गुरुवाणी किर्तनकार भाई इंद्रजीत सिंग खालसा यांचे किर्तन झाले. गुरुसिंग सभा गुरूद्वार संस्थेचे अध्यक्ष गुरूमीत सिंग रत्तू यांनी अतिथी कीर्तनकार व अतिथीचा  सन्मान केला व उपस्थितांचे  आभार व्यक्त केले. शेवटी गुरु का  लंगर या भव्य अन्न प्रसाद सेवेने भक्तीमय कार्यक्रमाची सांगता झाली.

YOUR REACTION?

Facebook Conversations