मानवता सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन देहूरोड श्री शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पत्र.

देहूरोड दि. १९ :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सलामती पीर दर्गा धर्मदाय संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा सामाजिक बांधिलकीच्या नात्यातुन मानवतावादी कार्यात पुढाकार असतो ते देहूरोडकर असल्याने त्यांनी गरिब, विद्यार्थ्यांना व त्यांचा पालकांना शैक्षणिक पालकत्व स्विकारुन दिलासा देण्यासाठी त्यांनी देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना दिलेल्या विनंती पत्रात कोरोना महामारीच्या काळात अनेक गोरगरिबांचे नोकरी,रोजगार जाऊन त्यांची कौटुंबिक दुरावस्था झाली. मुलांचे शिक्षणाची वाताहत झाली . मानवता व सामाजिक बांधिलकीच्या नात्यातुन अशा परिस्थितीतील गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनींचे सलामती पीर दर्गा धर्मदाय संस्था एक वर्षा साठी शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची जबाबदारी घेतली आहे. तरी या संबंधी अशा गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनींचे एक वर्षा साठी शैक्षणिक पालकत्व संस्थेला देऊन मानवता सेवेची संधी द्यावी अशी विनंती सलामती पीर दर्गा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केली आहे. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे

बातमी व जाहीराती साठी संपर्क ७२१९५००४९२/९७६७५०८९७२

YOUR REACTION?

Facebook Conversations