महिलेला शिक्षा म्हणून १५० उठाबशा, देहुरोड पोलीस ठाण्यात ५ जणांनवर गुन्हा दाखल.

 देहुरोड दि. १० :- लग्न होऊन काहीच दिवस झालेल्या महिलेला घरच्या लोकांच्या वतीने विवाहितेचा शारीरीक व मानसीक छळ करत तिला शिक्षा म्हणून कधी १५० उठाबशा काढायला लावल्या तर कधीगळा दाबून तिला जिवेमारण्याचा प्रयत्न केला. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात आरोपीवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला,मोसीन मुबारक मुल्ला, दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार हा सारा प्रकार ९ मे रोजी देहुरोड येथे घडला असून, आरोपी हे लग्न झाल्यापासून छोट्या-छोट्या कारणावरून पीडितेला सतत शारिरीक व मानसीक त्रास देत होते. यात कमरेच्या पट्याने मारहाण केली. तसेच १५० उठाबशा काढायला लावल्या व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने सरळ देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations