पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली मान्यता अचुक नकाशा प्रसिद्ध होत असल्याने अनेक सदनिके धारकांना दिलासा.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पिंपरी दि. २८: देहूरोड आणि दिघी भागातील संरक्षित जागेची (रेडझोन) महापालिका नव्याने मोजणी करणार आहे. त्यासाठी एक कोटी १३ लाख ६७ हजार  मोजणी शुल्क भूमी अभिलेख विभागाच्या पिंपरी-चिंचवड आणि हवेली विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. मोजणीमुळे नवीन अचूक, स्पष्ट रेडझोनचा नकाशा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेडझोनच्या सीमेबाबतचा संभ्रम दूर होईल. या बाबत मधल्या काळात देहूरोड  रेडझोन हटाव देहूरोड बचाव कृती समिती व फुले शाहु आंबेडकर मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते  या बाबत नकाशा प्रसिद्ध करावा व हद्द जाहीर करावा असे मागणी केली होती त्यासाठी तहसीलदार तलाठी कार्यालयातून अनेक भागाचे सात बारा तहसीलदार कडे सोपविण्यात आले होते व मोजणीची मागणी ही केली होती त्यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड कडे मोजणीसाठी शुल्क भरण्यास असमर्थता दाखवली होती आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या गोष्टीचा खुलासा होणार व नागरिकांना  दिलासा मिळणार आहे 

पिंपरी-चिंचवड शहरालगत देहूरोड आणि दिघीत संरक्षण विभागाचे क्षेत्र आहे.  देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या आणि दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार यार्ड (१.८२ किलोमीटर) परिघामध्ये  रेडझोन आहे. रेडझोनमध्ये कोणतेही बांधकाम करता येत नसतानाही अनधिकृतपणे निवासी बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. जुने,  बैठे घर असलेल्या रहिवाशांना नव्याने बांधकाम करता येत नाही. तसेच नवीन सदनिका घेण्यासाठी बॅंकेचे लोन देखील पास होत नसल्याने अनेक लोक अडचणीत सापडले होते म्हणून ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन देहूरोड रेडझोन हटाव देहूरोड बचाव कृती समिती आणी फुले शाहू आंबेडकर विचार मंच सह अनेक संघटनेने रेडझोनच्या हद्दीमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने मोजणीची मागणी केली जात होती. या बाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेऊन हा विषय आपन संसदेत मांडावा असे विनंती अर्ज दिले होते. 

महापालिका रेडझोन बाधित क्षेत्राची मोजणी करणार आहे.  पिंपरीतील भूमी अभिलेख विभागाच्या नगर भूमापन अधिका-यांकडून   देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या बाह्य सीमा भिंतीपासून दोन हजार यार्ड परिघातील शहरातील हद्दीची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी एक कोटी सात लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे. तर, हवेली भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक  हे दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार यार्ड रेडझोन परिसराची मोजणी करणार आहेत. त्यापोटी सहा लाख ६६ हजार रुपये  शुल्क दिले जाणार आहे. दोन्ही संरक्षित क्षेत्रातील हद्द मोजणीसाठी येणा-या एक कोटी १३ लाख ६७ हजार  रुपये खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

प्रतिक्रिया :-  प्रसाद गायकवाड, उपसंचालक,नगररचना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

महापालिका क्षेत्रामधील रेडझोन हद्दीची मोजणी केली जाणार आहे. मोजणी शुल्क तत्काळ जमा केले जाईल.  मोजणी पूर्ण झाल्यानंतर अचून नकाशा प्रसिद्ध केला जाईल.

अमित गावडे,माजी नगरसेवक :- रेडझोनमधील नागरिकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. मालमत्तेवर कर्ज, जमीन विकसित करता येत नाही. घरांची विक्री सुद्धा करता येत नाही. कोणते क्षेत्र रेडझोन हद्दीमध्ये येते याची नागरिकांना पुरेशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. मोजणीमुळे हे सर्व संभ्रम दूर होईल. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

YOUR REACTION?

Facebook Conversations