मारहाण करणारे आरोपी शिवाजीनगर येथील.
944
views

जस्ट आज वृत्त दि. १५ :- आज कालचे तरूण किरकोळ कारणावरून काहीही भांडणे करतात असेच एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी दि. १३ रोजी रात्री दहा वाजता देहूरोड येथे घडली.


छोटू लक्ष्मण जतने, सुरज लक्ष्मण जतने, साहिल लक्ष्मण जतने, लक्ष्मण जतने (सर्व रा. शिवाजी नगर,देहूरोड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमर कासीम शेख (वय 22, रा. आंबेडकर रोड, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूरोड येथील एका मेडिकल दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी छोटू आणि फिर्यादी यांच्यात एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून छोटू याने त्याच्या भाऊ आणि वडिलांना बोलावून फिर्यादीस बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations