अनेक संघटनेच्या वतीने पाणी, सरबत, अन्नदान वाटप, हजारो भीमसैनिकाच्या बाबासाहेबांच्या जय घोषाने देहूरोड परिसर दुमदुमून गेले.

 देहूरोड दि. १५ :- महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देहूरोड शहरात उत्साहापुर्ण साजरा करण्यात आला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त देहूरोड परिसर शहर फुलून गेले चौका चौकात डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अनेक संघटना, सामाजिक संस्था यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आले महामानवास अभिवादन करण्यासाठी शहरातील चौकट चौकात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अनेक संघटनाचे व राजकीय पक्षाच्या वतीने भीम जयंती साजरा करण्यात आले शुभेच्छा देत बाबासाहेबांचा नावाचे जयघोष करून अभिवादन केले. बाबासाहेबांच्या जय घोषाने देहूरोड शहर दुमदुमून गेले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने अनेक संघटनेच्या वतीने प्रत्येक ठिक ठिकाणी पाणी, जेवण, शरबत वाटप चौका चौकात करण्यात आला जयंती असल्याने निळ्या झेंड्यानी परिसर ढवळून निघाले सायंकाळी ५ वाजता शितळानगर, विकास नगर, गांधी नगर, एम बी कॅम्प, पारशीचाळ या ठिकाणाहून जबरदस्त डीजे च्या दणदणीत आवाजात बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून भीम अनुयायी डीजेच्या तालावर बेधुंद पणे महिला, पुरूष, युवा, युवती नाचत जयघोष करत सारा परिसर दणाणून सोडले. डीजे च्या तालावर नाचत जेव्हा वेगवेगळ्या डीजे मिरवणूक हे ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात येताच एकच गर्दी झाली हजारो भीम अनुयायीनी एकत्र येऊन जय जय जय जयभीम, डॉ बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो, एकच साहेब बाबासाहेब असे जोरदार घोषणा देऊन अक्षरश सारा परिसर दुमदुमून सोडले ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौक येथून पुढे ऐतिहासिक धम्म भुमी येथे जयंती ची सांगता झाली. जयंतीनिमित्त देहूरोड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवले ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेऊन कुठले ही अनुचित प्रकार घडु नये याची पुरेपुर दक्षता घेतली होती व सर्व संघटनेने देखील पोलीसांना सहकार्य केले व आनंदाने जयंती साजरा केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations