अनुप दाभोळे,विजय तेलगु यांचा पुढाकार

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. ७ देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष ॶॅड.कृष्णा दाभोळे यांनी पक्षाची भक्कम मोट बांधून संघटनात्मक कार्यात आणि देहूरोड कर नागरिकांच्या मुलभुत समस्या निवारण कार्यात आघाडी मारली आहे.त्या कार्याकडे आकर्षित होऊन देहूरोड शहरातील १५० भा.ज.प.चे कार्यकर्त्यांनी देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश केला.


 देहूरोड दत्त मंदिरात हा जाहीर प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण विभागाचे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा हेमा रेड्डी, देहूरोड शहराध्यक्ष ॶॅड .कृष्णा दाभोळे, उपाध्यक्ष ॶॅड .प्रवीण झेंडे. राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष आशीष बन्सल, राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय सेलचे देहूरोड शहराध्यक्ष शीव कुमार मुर्गन, ऊर्फ बिल्ली आण्णा . राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष शीतल हगवणे राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष शंकर स्वामी या पक्ष प्रमुखांनी नव पक्ष सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच या वेळी बाबू तेलगु या युवकाची राष्ट्रवादी युवक काँग्रेस देहूरोड शहर उपाध्यक्ष पदी, रमेश पगारी या युवकाची राष्ट्रवादी युवक काँग्रेस देहूरोड शहर सह सचिवपदी ,तर प्रशांत नरसिंह या युवकांची राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय युवक देहूरोड शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नव नियुक्त पदाधिकारी यांना वरील मान्यवर पदाधिकारी यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले . 


 या वेळी कैलाश गोरवे,रेणु रेड्डी,गणेश कोळी,जाफर शेख.या पक्ष पदाधिकारी सह अर्चना कोळी, राजश्री राऊत, सुनिता विश्वकर्मा,धनश्री दिंडे या महिला पदाधिकारी उपस्थित होते. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे.                बातमी व जाहीराती साठी संपर्क.             📞9767508972/7219500492

YOUR REACTION?

Facebook Conversations