शासनाच्या नियमानुसार बिज उत्सव सोहळा

देहूरोड पुणे दि:३०

 देहूरोड .टाळ मृदुगांच्या निनादात , पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल घ्या नाम घोषात कोरोना महामारी मुळेअवघ्या पन्नास मान्यवरांच्या उपस्थितीत ३७३वा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा श्री क्षेत्र देहू वैकुंठ गमन स्थळी संपन्न झाला. कोरोना महामारी घ्या वाढत्या प्रार्दुभावा मुळे शासना दिलेल्या सूचनांचे पालन करून देहू देवस्थान ने तूकाराम बिज सोहळा पार पाडला. बिज सोहळा निमित्त आज पहाटे ३वा. मुख्य देऊळ वाड्यातील मुख्य मंदिरात देहू देवस्थान चे अध्यक्ष ह.भ.प.मधूकर महाराज मोरे यांच्या हस्ते व देवस्थान विश्र्वस्तांच्या उपस्थितीत काकड आरती झाली. पहाटे ४वा. मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरात तसेच गोपाळ पुर्यातील वैकुंठ गमन स्थानातील पांडुरंग मंदिरात महा पुजा झाली.सकाळी १०वा. देऊळवाड्यातुन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी गोपाळ पुरा वैकुंठ गमन स्थळी प्रस्थानास प्रारंभ झाला. टाळ मृदुंगाच्या निनादात हरिनाम घोष करीत वाजत गाजत दुपारी १२च्या सुमारास पालखी गोपाळ पुरातील वैकूठ गमन स्थळी सजविलेल्या मंडपात आगमन झाले. तेथे देहू देवस्थान चे विश्र्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प.संजय महाराज,संतोष महाराज,अजित महाराज यांच्या उपस्थितीत देवस्थान चे अध्यक्ष ह.भ.प.मधुकर महाराज मोरे, यांच्या सह खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरी चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश ,हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बारवकर, देहू पंचायत नगरीचे प्रशासक मधुसूदन बर्गे,यां मान्यवरांच्या हस्ते महापुजा झाली.या वेळी सहा.पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,सहा.पोलिस आयुक्त आनंद भोईटे, दे हूरोड विभागाचे पोलिस उपायुक्त संजय नाईक पाटील.देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे हवेली चे मंडल अधिकारी शेखर शिंदे,देहूरोड चे तलाठी अतुल गीते,देहू चे तलाठी सचिन मोरै, उपस्थित होते. तेथे ह.भ.प.देहूकर महाराजांचे संत तुकाराम सदेह वैकुंठ गमनांचे बिजेचे किर्तनाने व नांदुरकिच्या झाडावर फुले उधळीत भिजत सोहळा पार पडला.पालखी पुन्हा वाजत गाजत देऊळ वाड्यात स्थानापन्न झाली.पालखी पुढे पंरपरे नुसार फडकरी, दिंडीकंराचे रात्री आणि सकाळ पर्यंत किर्तन होईल. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations