......कोरोना रुग्णांचे हाल

पुणे खडकी दि.२४- बोपोडी भागातील परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहेत.त्या रुग्णांसाठी  कोविड व विलगीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. त्या साठी औंध आय.टी.आय.मधील बंद कोविड व विलगीकरण केंद्रं पुन्हा सुरु करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे वतीने पक्ष नेते संजय कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.निवेदनात संजय कांबळे यांनी म्हंटले आहे की मागील वर्षीच्या कोरोना प्रार्दुभावाच्या काळात येथील नागरिकांच्या सुविधेसाठी औंध आय.टी.आय. मध्ये३००बेड चे कोविड केंद्र उभारण्यात आले होते.ते सध्या बंद अवस्थेत आहे.  तेथे पुणे महापालिका प्रशासनाने आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचार्यांची नेमणूक करुन  कोविड वीलगीकरण केंद्र पुर्ववत सुरू करावे असे संजय कांबळे यांनी निवेदनात म्हंटले आहे.              

  वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख,महाराष्ट्र खडकी पुणे

YOUR REACTION?

Facebook Conversations