देहूरोड शहरात एक ही निराधार गरीब उपाशी राहणार नाही-अतुल मराठे

    देहूरोड दि.४ जून

 देहूरोड ः सेवाभावी मावळ तालुक्याचे कार्यक्षम लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके सोशल फाउंडेशन च्या वतीने गेले ९ दिवसा पासुन देहूरोड दरम्यान उड्डाण पूल,जेथे आश्रय मिळेल तेथे आश्रय घेणारे निराधार महिला पुरुष गरिबांना दोन वेळचे अन्नदान करीत आहोत. देहूरोड परिसरात देहूरोड उड्डाण पूल,देहूरोड बाजार पेठ रस्त्याच्या कडेला ,तसेच विकास नगर ते मुकाई चौका पर्यंत च्या गरिबी उपासी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आलेत. अशा वेळी गरिबांना थंडी गारव्यात अंगावर पांघरून नसल्याने त्यांचे हाल होतात. हि बाब आमदार सुनिल अण्णा सोशल फाउंडेशन च्या वतीने आज निराधार गरीबांना युवा नेते अतुल मराठे आमचे मार्गदर्शक धर्मपाल तंतरपाळे यांच्या हस्ते चादरी चे वाटप करत आहोत. असे सेवा भावी युवा नेते पंकज तंतरपाळे यांनी सांगितले, २६ मे पासुन त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन वेळेचं अन्नदान कार्यक्रम राबवित आहेत, व पुढे ही हा कार्यक्रम चालू राहिलं अशी सेवा भावी उपक्रमांचे माहिती देताना पंकज तंतरपाळे यांनी सांगितले.आज दि.३ जून रोजी सायंकाळी ८ वाजता गरिब, निराधार,गरजूंना,५० चादरी चे वाटप करण्यात आले, प्रारंभी युवा नेते व सेवा भावी उपक्रमांना प्रोत्साहन देणारे अतुल मराठे,व मार्गदर्शक धर्मपाल तंतरपाळे यांचे हस्ते अन्न पाकिटे व चादरी चे वाटप करण्यात आले. या सेवा भावी उपक्रमाचे मार्गदर्शक धर्मपाल तंतरपाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून लोक आमदार सुनिल आण्णा शेळके सोशल फाउंडेशन च्या वतीने पंकज तंतरपाळे व त्यांचे युवा सहकारी गोरं गरीबांची सेवा करुन सुत्य उपक्रम राबवित आहेत याचा त्यांनी गौरव केला. युवा नेते अतुल मराठे यांनी कोरोना जशी सुरू झाली तेंव्हा पासुन पंकज तंतरपाळे त्यांचे युवा सहकारी निराधार गरिबांना अन्नदान सेवेचे कार्य करीत आहेत.लोक आमदार सुनिल आण्णा शेळके सोशल फाउंडेशनच्या वतीने गेले ९ दिवसा पासुन देहूरोड शहरात गरीबांना दोन वेळचे अन्न दान वाटप करुन सेवेचे म्हत्वपूर्ण कार्य करीत आहेत.पंकज तंतरपाळे व त्यांच्या युवा सहकार्याच्या सेवा कार्याला सदिच्छा दिल्या. या वेळी युवा नेते अतुल मराठे, धर्मपाल तंतरपाळे, पंकज तंतरपाळे, रमेश पवार, योगेश कसबे, श्रीराम पोबल, ईरण्णा चुक्का,रवि अण्णा गदग,अजीज शेख, दिपक मधुरकर, प्रशांत जोगदंड, उपस्थित होते. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations