पंतप्रधान कार्यालयात पीएमओ सेक्रेटरी असल्याची बतावणी करून फसवणूक, बाॅर्डर लेस वल्र्ड फाऊंडेशन च्या कार्यक्रमात घेतला सहभाग, आणि बिंग फुटले.

पुणे दि. ३१ :-  पोलीस अधिकारी बनुन तोतयागिरी करत लोकांची दिशाभूल करीत मी आयएएस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया आएएसला पोलीसांनी अटक केले आहे मी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी असल्याचे सांगून गोपनीय काम करीत असल्याचे सांगणारा पोलिसांच्या चौकशीत तोतया आएएस निघाला.

 गेल्या चार पाच वर्षांपासून तो आयएएस अधिकारी  असल्याचे सांगून पंतप्रधान कार्यालयात दिल्लीला कामाला असल्याचे सांगत फिरत होता.

 वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे) असे त्याचे खरे नाव आहे. गुन्हे शाखेच्या  युनिट १ ने त्याला अटक केली आहे.

 याबाबतची माहिती अशी, बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन  या संस्थेचा औंध येथे २९ मे रोजी सकाळी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी अ‍ॅम्बुलन्स पाठविण्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमाला विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्त व इतर ट्रस्टी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून आलेली एका व्यक्तीने आपले नाव डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आयएएस या पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे आहे. ते गोपनीय काम करीत असतात, असे सांगितले. या बाबत संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांच्या आय ए एस पदाबाबत संशय आला. 

या पदाधिकार्‍यांनी आपला संशय गुन्हे शाखेकडे बोलून दाखविला. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे कबुल केले.

 ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे ,सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चेवरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर,पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे. पुणे पोलीस या तोतयागिरी करणाऱ्या आएएस ने कुठे कुठे फसवणूक केली याचा अधिक तपास करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations