सरकारी वकिलाने प्रभावीपणे युक्तिवाद केल्याने व सबळ पुराव्यामुळे आरोपीला न्यायालयाने सुनावले शिक्षा.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. :- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १० मे २०१७ रोजी आंबेडकरनगर, देहूरोड येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी शिक्षा सुनावली.

 योगेश दत्तात्रय हेमाडे (वय २०, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०१७ रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आंबेडकरनगर देहूरोड येथे आरोपी योगेश हेमाडे याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने मुलीला ‘तू कोणाला सांगितले तर तुझी बदनामी होईल  मी तर जेलमधून सुटून बाहेर येईल’ अशी धमकी दिली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देहूरोड पोलिसांनी योगेश याला अटक केली होती. त्याच्याकरता सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. हा खटला सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी चालविला व न्यायालयात प्रभावीपणे युक्तीवाद केला. त्याकरीता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करुन सरकार तर्फे पिडीतासाठी भक्कमपणे बाजू मांडली.न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी योगेश हेमाडे याला २० वर्षे  कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच आरोपीने दंड न भरल्यास सहा महिने अधिक कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तनपुरे, कोर्ट अंमलदार बाळू तोंडे यांनी या खटल्यामध्ये न्यायालयात पाठपुरावा केला.

YOUR REACTION?

Facebook Conversations