कंपनीचे ओळखपत्र, समंती पत्र, पोलीसांना दाखवले तर अडवणूक करणार नाही -: पोलीस सह आयुक्त डॉ. शिसवे

 पुणे दि. ४ -: वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कठोरपणे संचारबंदी नियम निर्बंध लावण्यात आले आहेत शहरात हजारो कामगार कामावरती येत जा करीत आहेत. त्यामुळे कामगारांना ही कामावर जाण्यासाठी येण्यासाठी खाजगी कंपनी, लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, वर्कशॉप मध्ये काम करीत असलेले छोटे मोठे कामगारांना दिलासा देण्यासाठी पोलीस लोक नाक्यावर मदत करणार आहेत या मुळे कामगारांना ही थोडे दिलासा मिळाला आहे. शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू होणार असली तरी उद्योग व खाजगी स्थापन यामधील कामगारांना कामावर ये-जा करण्यास परवानगी असे मात्र संबंधित कामगारांकडे ओळखपत्र किंवा संबंधित कंपनीचे संमतीपत्र असणे गरजेचे आहे ते ओळख पत्र संमती पत्र तपासणी नाक्यावरील पोलिसांना दाखवल्यास त्यांची अडवणूक होणार नाही असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सह जिल्ह्यात करुणाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत मात्र उद्योग क्षेत्रा साठी सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याबरोबरच त्यातील कामगारांना कामावर विनाअडथळा ये जा करता येईल यासाठीही परवानगीने देण्यात आली आहे. परंतु कामगारांना ओळख पत्र कंपनीचे पत्र सोबत बाळगावे लागणार आहे. याविषयी डॉ. शिसवे म्हणाले संबंधित आस्थापनाने कळविले आहे तेच ओळखपत्र संमती पत्र तपासणी नाक्यावर दाखवावे वैद्यकीय किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या कारणासाठी घराबाहेर पडताना त्यासंबंधीचे कागदपत्र नागरिकांनी जवळ बाळगावीत नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजावून घेत नियमांची अंमलबजावणी केली जाईल. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत नागरिकांनेही संचार मनाई च्या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नये असे ही सूचविले आहे. 

YOUR REACTION?

Facebook Conversations