एकता पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष एम.ए कूद्दुस यांनी तनवीर मुजावर यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. तनवीर मुजावर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्त संपादक अशोक कांबळे.

 देहूरोड दि. ०६ :- मानवता कार्यासह पत्रकारितेत आघाडीवर असलेले ख्यातनाम व्यक्तीमत्व तनवीर मुजावर यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन एकता पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ए.एम. कुद्दूस यांनी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष संघपाल सिरसाट,संस्थापक सदस्य अबरार अहमद,कोषाध्यक्ष डि.जे.वानखेडे. महानगर अध्यक्ष राहुल जाधव यांच्या उपस्थितीत तनवीर मुजावर यांची एकता पत्रकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. तनवीर मुजावर ह्युमन राईटस जस्टिस अशोसिएशन या मानवतावादी राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तर विदर्भात सह महाराष्ट्रात ख्यातनाम अशा साप्ताहिक उपेक्षीत व-हाड चेे पश्चीम महाराष्ट्र प्रतिनिधी पदी कार्यरत आहेत. तनवीर मुजावर यांची नियुक्तीची वार्ता कळताच ह्युमन राईटस जस्टिस असोसिएशन संघटनेच्या पूणे जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकित तनवीर मुजावर यांच्यावर संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ईम्तियाज शेख,मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, उपाध्यक्ष अमीरखान  आत्तार  सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे,पुणे जिल्हा संघटक दीपक चौगुले मावळ तालुका अध्यक्ष  अमीर शेखर  ह््युम राईट्स फाॅर प्राॅटेक्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी  यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून एक सच्चा कर्मयोगीची नियुक्ती केल्या बद्दल एकता पत्रकार परिषदेचे सन्मानिय अध्यक्ष ए.एम. कूद्दुस यांचे आभार व्यक्त केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations