सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी, जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार.
313
views

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. ५ :- चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष म्हणत देहूरोड सकल मराठा समाजाच्या वतीने देहूरोड मध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण ला बसले असता राज्य शासनाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर  उपोषण मागे घेतले मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण मात्र चालू राहील असे जाहीर केले राज्यभरात आताही साखळी उपोषण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर देहूरोड शहर सकल मराठ्यांच्या वतीने देहूरोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान येथील स्वामी विवेकानंद चौक येथे साखळी उपोषण करण्यात आले या उपोषणाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाले आहे. यावेळी सर्व पक्षाचे नेत्यांनी पाठिंबा जाहीर करत या साखळी उपोषणला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करून सायंकाळी सहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले प्रथम साखळी उपोषण दिनांक ३ रोजी नियोजित करण्यात आले होते नंतर हे उपोषण पुढे ढकलून परत दिनांक ४ रोजीचे पत्र देहूरोड पोलीस ठाण्याला देण्यात आले पण दिनांक चार रोजी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याने पोलिसांच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्याचे आंदोलकांना विनंती केले पण आंदोलकांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची भेट घेऊन हे आंदोलन स्थगिती करणार नाही अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतले आहे पण साखळी उपोषण मागे घेतलेले नाही असे सांगितले तेव्हा आम्ही हे आंदोलन शांततेने एक ठिकाणी बसून करणार आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांना सांगितले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी हे मान्य केले व आंदोलन करण्याची परवानगीने देत फक्त आंदोलन बसुन करा फक्त कॅण्डल मार्च वगैरे करू नये रस्ता कोणी अडवू नये असे त्यांनी सुचविले आंदोलकांनी हे मान्य करत आम्ही एक ठिकाणी बसून आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत आंदोलन आम्ही करणार आहे असे सांगितले तेव्हा जोशपूर्ण वातावरणात दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पंचक्रोशीतील सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय पक्षाचे लोकांनी हजेरी लावून उपोषणाला पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाची सुरुवात केली यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, आरक्षणा आम्हाला मिळालाच पाहिजे असे जोरदार घोषणाबाजीने देहूरोड परिसर दणाणून सोडले यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आता मराठ्यांच्या अंत पाहु नका, येत्या काळात तुमची जागा दाखविल्या शिवाय हे मराठे गप्प बसणार नाही,जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील तसेच देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना विनंती केली आमचे भावना आपण सरकार पर्यंत पोचवा असे जाहीरपणे सांगितले सायंकाळ पर्यंत आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला या आंदोलनात सर्व पक्षाचे नेते बसले असता देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे देखील या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला सायंकाळी सहा वाजता देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी उपोषणला बसलेले उपोषणकर्ते दीपक चौगुले, रमेश जाधव, हिरामण साळुंखे, विशाल दांगट, संदीप बालगरे, चंद्रकांत दाभोळे, देवा कांबळे, शशिकांत सप्पागुरु या बसलेल्या उपोषणकर्त्याना दिगंबर सुर्यवंशी यांनी आपल्या हाताने सरबत पाजून एक दिवशी उपोषणाची सांगता केली. 

यावेळी जमलेले व पाठिंबा दर्शविण्यात सर्व पक्ष लोकांनी जोरदार घोषणाबाजी दिल्या एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचा हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, मराठा आरक्षण मिळाल्याच पाहिजे, जय भवानी जय शिवाजी च्या जोरदार घोषणाबाजी देऊन आंदोलकांनी या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी उपोषणाच्या ठिकाणी चौख बंदोबस्त  ठेवले होते यावेळी गोपनीय शाखेचे अजित सावंत यांनी या साखळी उपोषणाची माहिती घेतली आभार प्रकाट किशोर गाथाडे यांनी मानले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष एड. कृष्णा दाभोळे, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण झेंडे,  मनसे नेते मोजेस दास, युवा नेते धनंजय मोरे, राष्ट्रवादी नेते किशोर गाथाडे,  शिवाजी दाभोळे, आरपीआय नेते श्रीमंत शिवशरण, ज्येष्ठ शिवसेना नेते विलास हिनकुले, रंगनाथ राजले, अरुण जगताप, बाबू नायडू, देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष लहूमामा शेलार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, व्यापारी संघटनेच्या वतीने विशाल खंडेलवाल, उमेश जैन, महावीर बरलोटा, भाजपा नेत गुरमीत सिंग रत्तू, आरपीआय नेते इंद्रपाल सिंग रितू अमित छाजेड, सुनील गायकवाड, देहूरोड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर यलवंडे,  देहूरोड फाॅटोग्राफ असोसिएशन चे बाबु टेक्केल, भाजी मंडई वतीने महेंद्र सरोदे, शिवसेना नेत्या सुनंदा आवळे, राष्ट्रवादी नेत्या धनश्री दिंडे, दिपाली चासकर, राष्ट्रवादीचे नेत्या शीतल हगवणे, मानव आधार संघटनेचे बाबू हिरे मेटकर, ह्युमन जस्टीस असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनवर अली शेख, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रफीक शेख, देहूरोड शहर ब्लॉक कांग्रेस शहर अध्यक्ष हाजीमलंग मारीमुतू, युवक काँग्रेसचे मलिक शेख, बाळू जाधव, तुकाराम जाधव, विनायक जाधव, राहुल बालघरे, धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के एच सूर्यवंशी, सरचिटणीस प्रकाश कांबळे (रुईकर) पिपल्स पार्टी चे परशुराम दोडमणी, समता सैनिक दलचे संजय आगळे, सुभाष चंडालिया, संदीप बहोत या सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

YOUR REACTION?

Facebook Conversations