आरक्षण मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रवाना करण्या साठी निवेदन देहूरोड सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासराव सोंडे यांना सुपुर्द

देहूरोड दि. ०९ 

देहूरोड -: सकल मराठा समाजावर झालेला अन्याय आपण संसदेच्या माध्यमातून आरक्षण देऊन दुर करावा .असे मागणीचे साकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देहूरोड शहर सकल मराठा समाजाने निवेदनाद्वारे टाकले आहे. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रवाना करण्यासाठी देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासराव सोंडे यांना देहूरोड सकल मराठा समाज संघटनेच्या शिष्ट मंडळाने निवेदन सुपुर्द केले.  

या शिष्ट मंडळात जेष्ठ नेते सुदामराव तरस, प्रविण झेंडे, अॅड. कृष्णा दाभोळे, दीपक चौगुले, रमेश जाधव, धनंजय मोरे,बाळासाहेब फाले, चंद्रकांत दाभोळे सहभागी होते.

 विशेष वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations