५० हजार रुपयेचा पिस्टल व एक जीवत काडतूस जप्त.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. :- पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी दि. ३० सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण मंदिराजवळ देहूरोड येथे करण्यात आली.पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी दि. ३० रोजी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण मंदिराजवळ देहूरोड येथे करण्यात आली.कुणाल सुभाषचंद्र वाल्मिकी (वय २९, रा. श्रीकृष्ण मंदिराजवळ, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वप्निल साबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबी कॅम्प देहूरोड येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ राहणाऱ्या कुणाल वाल्मिकी याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations