ग्राहकांच्या वतीने अभियंता व कर्मचार्याचे अभिनंदन करून कार्याचे कौतुक

देहूरोड दि : एन दिवाळी तोंडावर आले असताना देहूरोड येथील संकल्प नगरी येथील रोहित्र जळाल्याने संपूर्ण संकल्प नगरी अंधारमय झाले या मुळे दिवाळी अंधारात जाते का काय? अशी परिस्थिती संकल्प नगरी मध्ये निर्माण झाली. पण महावितरणच्या तत्परतेने अंधारात बसलेले संकल्प नगरी रहिवाश्यांना महावितरणाच्या तत्परतेने संकल्प नगरी फक्त पाच तासाच प्रकाशमय करून सुखद धक्का दिला. 

गेल्या बुधवारी रोहित्रेला मोठी आग लागली आग लागल्याने रहिवाश्यान मध्ये घबराहटीची परिस्थिती निर्माण झाली संकल्प नगरी चे रहिवाश्यांनी सामाजिक कार्यकर्ते अजितदादा पवार शोशल फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंकज तंतरपाळे यांना संपर्क साधुन सर्व हकीगत सांगितले  परिस्थितीचा भान ओळखुन क्षणाचा ही विलंब न करता पंकज तंतरपाळे यांनी वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला तसेच अग्निशामक कार्यालयाला तातडीने संपर्क करून अग्निशामक दल बोलावले सकाळी ७ वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी दुपारी १२च्या दरम्यान आग आटोक्यात आणली यामुळे जीवीत हानी टळली देहूरोड येथे संकल्पनगरीमध्ये आगीत भस्मसात झालेले ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वीज वितरण ने बघितले तर ते  होण्याचा परिस्थिती नव्हता  दुरुस्ती करण्यासाठी खुपच कसरतीची गरज होती आणि कमीत कमी १८ ते २० तास दुरुस्ती साठी लागणार होते पण वीज कर्मचार्यानी हार न मानता केवळ पाच तासांमध्ये विद्युत रोहित्र बदलण्यात आले. सोबतच जळालेली वीजयंत्रणा दुरुस्त करून ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा तत्परतेने सुरळीत करण्यात आला. या सुखद अनुभवामुळे संकल्पनगरीच्या सदनिकेतील लोकांन मध्ये आनंदफुलला या एन दिवाळीच्या दिवशी अंधारात बसलेले सदनिकेतील लोकांनी महावितरणचे सहायक अभियंता मनोज पुरोहित व सहकाऱ्यांचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले.

तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास सहायक अभियंता यांनी आपले सर्व कर्मचारी सह मनोज पुरोहित व सहकाऱ्यांनी वीजयंत्रणा दुरुस्तीचे आणि जळालेला रोहित्र बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महेश देशमुख यांनी तातडीने नवीन रोहित्र, वीजवाहिन्या व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. जळालेल्या वीजवाहिन्यांसह जेसीबी क्रेनच्या सहाय्याने रोहित्र बदलण्यात आला. आगीमुळे अत्यंत कठीण परिस्थिती असताना अवघ्या पाच तासांत वीजपुरवठा सुरळीत करून संकल्पनगरीच्या ग्राहकांना महावितरणच्या सेवेचा सुखद प्रत्यय दिला. या कामगिरीची दखल घेऊन या वीजग्राहकांनी देहूरोड कार्यालयात सहायक अभियंता श्री. मनोज पुरोहित, जनमित्र नितीन भारंबे, अजय फाटे, स्वप्निल धांडे, निखिल दामदर, नीलेश नायकोडी यांचा सत्कार केला. तसेच या रोहित्र जळाल्याने तत्परचे पाऊल उचलून अंधारात बसलेले रहिवाश्यांना पंकज तंतरपाळे व शाहु फुले आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांचे ही मदतीने जळालेले रोहित्रचा कामाला हातभार लावला त्यामुळे संकल्प नगरी सदनिकेतील लोकांनी अजितदादा पवार शोशल फाऊंडेशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंकज तंतरपाळे व धर्मपाल तंतरपाळे यांचे ही आभार प्रकट केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations