या वर्षी हि ईदगाह मैदानं,व मस्जिद खाली खाली दिसत होती

देहूरोड पुणे १५ मे

शुक्रवारी दि.१४ मे देहूरोड शहरात व पुणे जिल्ह्यात संपूर्ण देेशात ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद हा सण साजरा करण्यात आला परंतु यावर्षी रमजान ईद च्या नमाज साठी ईदगाह मैदाने, मस्जिद सार्वजनिक ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती,या अल्लाह,या जगावरील कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दूर कर आणि सर्वांना आरोग्यदायी,ऐश्वर्यसंपन्न जीवन दे 'अशी प्रार्थना करत रमजान ईद यंदाही सर्वत्र साध्या पद्धतीने परंतु तितक्याच उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात ईद साजरा करण्यात आली. यावर्षीही रमजान ईदच्या नमाजासाठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती . त्यामुळे मुस्लीम बंधू भगिनींनी आपल्या घरीच राहूनच रमजान ईद ची नमाज अदा केली,अल्लाह कडे दुवा ( प्रार्थना )करीत जगावरील कोरोनाचे हे संकट लवकर दूर करण्याचे आवाहन प्रार्थनेद्वारे केले . गतवर्षीही कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही . यंदाही तशीच परिस्थिती असल्याने कोरोनाच्या सावटाखाली घरच्या घरी हा सण साजरा करून मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या . त्यामुळे पुणे शहरातील सर्व ईदगाह मैदाने यंदा मोकळीच असल्याचे पाहावयास मिळाली . दरम्यान ,सकाळपासूनच मुस्लीम बांधवांच्या घरांमध्ये सणाची जोरदार करण्यात येत होती . परंतु यंदा शेजाऱ्यांशिवाय अन्य मित्र - मैत्रिणी अथवा नातेवाइकांना घरी बोलविता आले नाही . ईदनिमित्त मुस्लिम समाजबांधवांनी यंदा मोबाइलद्वारेच सणाच्या शुभेच्छा आणि संदेश देऊन धर्मातील नियमांचे व शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.अनेकांनी गरजूंना मदत केली,मुस्लीम समाजात उत्पन्नातील काही रक्कम जकात म्हणून दान करण्याची पद्धत आहे .त्यानुसार अनेकांनी आपल्या ऐपतीनुसार गरजूंना मदत करून ईदच्या दिवशी पुण्य कार्य केले देहूरोड येथील मदद फाऊंडेशन च्या वतीने पोलिस बांधवाना शिरखुर्मा वाटप करण्यात आले,व देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ते अशरफ अत्तार व मित्रपरिवार च्या वतीने गोर गरीब निराधार लोकांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले,या वर्षी कोरोना प्रादुर्भाव मुळे रमजान ईद कौटुंबिक वातावरणातच हा सण सर्वत्र आनंदात साजरा करण्यात आल्याचे दिसून आले . ईदगाह मैदानांवर दरवर्षी नमाजासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात ; परंतु यंदाही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने एकही मुस्लीम बांधव नमाजासाठी घराबाहेर पडला नाही .

मदद फाऊंडेशन देहूरोड च्या वतीने पोलिस बांधवाना शिरखुर्मा वाटप

मदद फाऊंडेशन देहूरोड च्या वतीने पोलिस बांधवाना शिरखुर्मा वाटप

मदद फाऊंडेशन च्या वतीने राशन किट वाटप

मदद फाऊंडेशन च्या वतीने राशन किट वाटप

अशरफ अत्तार व मित्रपरिवार

अशरफ अत्तार व मित्रपरिवार

YOUR REACTION?

Facebook Conversations